सोलापूर - पंढरपूर शहरातील बेकरीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात मुदत बाह्य कच्चा माल वापरून बेकरीचे पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले. यानंतर अन्न औषध प्रशान विभागाने बेकरी सील केली. ही कारवाई सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही बेकरी कोणत्याही परवान्याशिवाय चालत असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
पंढरपूर शहरातील स्थानक रस्त्यावरील बेकर्स गॅलरी या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तपासणी केली. या बेकरी दुकानाची अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासणी केली. तपासणीवेळी हे दुकान विना परवाना सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या दुकानात उत्पादित केले जाणारे बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापण्यात येत होता. तो कच्चा माल मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.
हेही वाचा - मायबाप सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष द्यावे, महिलांची मागणी
उत्पादित करण्यात येणाऱ्या बेकरी पदार्थांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल मुदतबाह्य असल्याचे तापसणीवेळी आढळून आले. त्यामुळे या दुकानाला सील ठोकण्यात आले. तपासणी अहवालाच्या अनुषंगे सुधारणा करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दुकानाला अन्न पदार्थ, कच्चा माल पुरवठा करणाऱ्या इतर दुकानांवर देखील कलम 14 अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा - ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : माऊली जमदाडे, अक्षय मंगवडे करणार सोलापूरचं प्रतिनिधित्व
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येतील, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.