ETV Bharat / state

भीमा नदीचा पूर ओसरतोय; पंढरपूरची वाहतूक लवकरच होणार सुरळीत

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे भीमा नदीचा पूर ओसरू लागला आहे. पंढरपूरची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

पंढरपूरची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
author img

By

Published : Aug 8, 2019, 5:45 PM IST

Updated : Aug 8, 2019, 5:58 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात भीमा नदीला आलेला पूर काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीत होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.

पंढरपूरची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण जिल्हा कोरडा असला, तरी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे. नदीला आलेल्या पुरामूळे नदी काठच्या 94 गावांना पूराचा फटका बसला आहे. दरम्यान, आता पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाणी कमी झाल्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली असून पंढरपूरची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू होणार आहे.

धरणातून भीमा नदीत सोडले जाणारे पाणी बुधवारी रात्रीपासून कमी केले आहे. त्यामुळे थोडा पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. अजूनही भीमा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली आहेत. मात्र पंढरपूरमधील अहिल्या पूल आणि नवीन पूल वाहतुकीसाठी लवकर खुला होईल, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात १ लाख क्यूसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू झाला, तर उजनी धरणातून पुन्हा भीमा नदीमध्ये पाणी सोडावे लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे.

Intro:mh_sol_02_flood_sitituation_7201168
सोलापूर जिल्ह्यातला पूर ओसरतोय
पंढरपूरला जाणारी वाहतूक लवकरच सुरू होणार
सोलापूर-
उजनी धरणात येणारा विसर्ग कमी झाल्यामुळे तसेच उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला आलेला पूर काही प्रमाणात ओसरत आहे. Body:सोलापूर जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण जिल्हा कोरडा असला तरी भीमा नदीला पूर आलेला आहे. भीमा नदीला आलेल्या पूरामूळे भीमा नदी काढच्या 94 गावांना पूराचा फटका बसला असला तरीही सोलापूर जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. अशातच पूणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे भीमा नदीचा पूर ओसरत आहे. पंढरपूर ची बंद करण्यात आलेली वाहतूक लवकरच सुरू करण्यात आली आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत सोडला जाणारा विसर्ग बुधवारी रात्रीपासून कमी केल्यामुळे पंढरपुरातील अहिल्या पूल तसेच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होईल. अजूनही भीमा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली आहेत. उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उजनी धरणातून भीमा नदी १ लाख क्यसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर निरेतून उजनीत येणारे पाणी देखील कमी करण्यात आली. त्यामुळे थोडा पूर ओसरायला सुरूवात झाली आहे.
पूणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पूणे जिल्ह्यात पून्हा पाऊस झाला तर पून्हा उजनी धरणातून पाणी भीमा नदीत सोडावे लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे.

Conclusion:नोट- एक व्हीडीओ एफटीपी वर पाठविला आहे. स्लग याच नावाने आहे.
Last Updated : Aug 8, 2019, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.