सोलापूर - शासकीय जिल्हा रूग्णालयात सध्या 25 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. 25 पैकी 21 व्हेंटिलेटर हे रुग्णालयातील विविध वार्डातील अतिदक्षता विभागात लावण्यात आलेले आहेत. तर 4 व्हेंटिलेटर हे कोरोना वार्डात लावण्यात आलेले आहेत. सोलापूर जिल्हा वार्षिक निधीमधून आणखी 5 व्हेटिंलेटर खरेदी करण्यात येणार असून येत्या दोन दिवसात नवीन व्हेंटिलेटर हे कोरोना कक्षात दाखल होणार आहेत.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा रुग्णालयातील ए ब्लॉक हा रिकामा करून तो पूर्णपणे विलगीकरण कक्ष करण्यात आलेला आहे. या कोरोना कक्षात एकूण 100 बेड असून सध्या 4 व्हेंटिलेटर आहेत. व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता रूग्णालय प्रशासनाकडून आणखी 5 व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आलेली होती. सोलापूरचे तत्कालिन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा वार्षिक निधीमधून 5 व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. येत्या दोन दिवसात हे 5 नविन व्हेंटिलेटर येणार आहेत.
हेही वाचा - सोलापुरातील 25 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह; मरकजवरुन परतलेल्या 11 जणांचाही समावेश