सोलापूर - पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे पाणी हे उजनी धरणात यायला सुरूवात झाली आहे. धरणात आलेल्या पहिल्या पाण्याचे पूजन हे करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी केले. डिकसळ पुलाजवळ पाण्याचे पूजन करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, धुळाभाऊ कोकरे, सुभाष गुळवे, अतुल पाटील, महादेव कामटे, कैलास बोंद्रे, डॉ. गोरख गुळवे, सतिश लकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जलपूजन केले.
चालू वर्षी पाऊस खूप लांबला आहे. त्यातच 100 टक्के भरलेले उजनी धरण हे वजा 40 टक्क्यापर्यंत खाली गेले होते. अशा परिस्थितीत उजनी धरण क्षेत्रातील शेतकरी चिंतातूर झालेला आहे. असलेल्या लोकांना होतो.
पुणे जिल्ह्यात झालेल्या पावासामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी येत आहे. दौंड येथून उजनी धरणात जवळपास 12 हजार क्यूसेक्सने पाणी उजनी धरणात येत आहे. उजनीच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी हे धरणात येत आहे. भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात मागील ३ दिवसात चांगला पाऊस झाला आहे. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी काही प्रमाणात पावसाचे पाणी हे उजनी धरणात येत आहे. चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना उजनी धरणातील पाणीसाठा वाढण्याची आशा लागलेली आहे. सध्या उजनी धरण हे वजा 50 टक्क्यापर्यंत गेलेले असल्यामुळे धरण लवकारत लवकर भरावी अशीच अपेक्षा उजनी धरणग्रस्तांनी जलपूजन करताना व्यक्त केली.