ETV Bharat / state

सोयाबीन कंपनीविरोधात सोलापुरात पहिला गुन्हा दाखल

author img

By

Published : Jul 7, 2020, 8:58 PM IST

बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांनी खरीपात सोयाबीनची पेरणी केली. बियाणे पेरले खरे मात्र बियाणे उगवलेच नाही. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांनीच बियाणे पेरायला गरबड केली असे सांगितले जाऊ लागले. मात्र, अनेक गावामध्ये पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे हा दोष शेतकऱ्यांचा नसून सोयाबीन बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

solapur
सोयाबीन कंपनीविरोधात सोलापुरात पहिला गुन्हा दाखल

सोलापूर- शेतकऱ्यांना पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे सोयाबीन कंपनीविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालूक्यातील वैराग परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोयाबीन कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोयाबीन उगवले नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी तालूक्यातील वैराग या गावाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार वैराग पोलिसात दिली आहे. कंपनीने निकृष्ट बियाणे देऊन फसवणूक केली असल्याची तक्रार 59 शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वैराग पोलीस स्टेशनमध्ये औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड कंपनीविरोधात पोलिसांनी गून्हा दाखल केला आहे.

वैराग परिसरातील 59 शेतकऱ्यांनी वैराग पोलिसांत तक्रार दिली

शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैराग पोलिसांनी औरंगाबादच्या ग्रीन गोल्ड सिड्स कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार्शी पंचायत समितीचे गुणवत्ता निरीक्षक तथा कृषी अधिकारी भारत दगडू कदम यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, बार्शी तालुक्यात ग्रीन गोल्ड सिड्स प्रा.लि.औरंगाबाद या कंपनीने मोठ्या प्रमाणात खरिप हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे विक्री केले आहे. तालुकास्तरीय बियाणे -तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी 59 शेतकऱ्यांच्या तक्रारीची स्थळ निरीक्षण पंचनामा करण्यात आला होता. यामध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन वान जे एस ३३५ ची पेरणी केली होती. त्याची निरधारित उगवण क्षमता कमी असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. उगवण क्षमता कमी असल्यामुळे या कंपनीविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या ५९ शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्या होत्या , याबाबत कृषी विभागाने स्थळ पहाणी करून पंचनामे केले होते .

या बियाणांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यांची उत्पादन क्षमता कमी आढळून आली. गुणवत्ता नसलेले निकृष्ठ दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवठा व वितरण करून शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान व आर्थीक फसवणूक केली. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापक भाऊसाहेब रामराव तुपे (नारायणपूर वाळुज (खुर्द) ता - गंगापुर, जि.औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकृष्ठ बियाणे वितरण करून पिकांचे नुकसान व आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्याने वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.