ETV Bharat / state

सहकारमंत्र्यांच्या लोकमंगलसह तीन साखर कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल - लोकमंगल साखर कारखाना

उसतोड कामगार आणि ऊसवाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कारखान्यांनी भरण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांने दिले होते. मात्र, सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीनही कारखान्यांनी उसतोड कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही.

सहकारमंत्री सुभाष देशमुख
author img

By

Published : Jul 3, 2019, 9:09 PM IST

सोलापूर - साखर कारखान्यांनी उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखन्यांसह सोलापुरातील तीन साखर कारखान्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नातेवाईकांचे लोकमंगलचे दोन साखर कारखाने आहेत, तर सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापूरातील मोठे प्रस्थ असलेल्या धर्मराज काडादी यांचा आहे.

उसतोड कामगार आणि ऊसवाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कारखान्यांनी भरण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी आयुक्तांने दिले होते. मात्र, आदेश देऊनही सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीनही साखर कारखान्यांनी २०१८ ते २०१९ या गाळप हंगामातील उसतोड कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, कार्यकारी संचालक संतोष कुंभार, लोकमंगल शूगर इथेनॉल अॅन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, विवेक पवार, पराग पाटील, संजय घोरपडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

Intro:r_mh_sol_03_fir_on_suger_factory_7201168

सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल साखर कारखान्यां विरूद्ध गून्हा दाखल
इपीएफ न भरणाऱ्या सोलापूरातील तीन साखर कारखान्याविरूद्ध गून्हा दाखल
सोलापूर-
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखन्यांसह सोलापूरातील तीन साखर कारखान्यांविरूद्ध पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे. उसतोड कामगार आणि उस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे हा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:उसतोड कामगार आणि ऊसवाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी हा कारखान्यांनी भरावा असे आदेश भविष्य निर्वाह निधी आयूक्तांने दिले होते. आदेश देऊनही साखर कारखान्यांनी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे सोलापूरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कराखाना, लोकमंगल शूगर, इथेनॉल अॅन्ड को. जनरेशन आणि लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज या तीन साखर कारखान्यांच्या विरोधात कर्मचारी भविष्य निधी कायदा 1952 च्या अतंर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नातेवाईकांचे लोकमंगलचे दोन साखर कारखाने आहेत.तर सिद्धेश्वर साखर कारखाना हा सोलापूरातील मोठ प्रस्थ असलेल्या धर्मराज काडादी यांचा साखर कारखाना आहे.
या तीनही साखर कारखान्यांनी 2018-2019 च्या गाळप हंगामा मध्ये उस तोडणी करणाऱ्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. त्यामुळे या कारखान्याच्या विरूद्ध चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात हा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी,कार्यकारी संचालक संतोष कुंभार, लोकमंगल शूगर, इथेनॉल अॅन्ड को-जनरेशन इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, विवेक पवार,पराग पाटील, संजय घोरपडे, यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
भविष्य कर्मचारी निधीच्या अनुशंगाने दाखल करण्यात आलेल्या या गून्हामध्ये तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. Conclusion:नोट- भविष्य निर्वाह निधीचा फाईल लोगो या बातमीसाठी वापरावा ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.