ETV Bharat / state

राज्याचे ऊर्जामंत्र्यावर 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल करा : मनसे

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काळातील वीजबिल माफ करेल व तसेच सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरसकट वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद केला जाईल, असा जीआर काढला आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांनी वीज बिलवरून जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केला आहे.

file an offense under section 420 against the state energy minister
राज्याचे ऊर्जामंत्र्यावर 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल करा
author img

By

Published : Jan 28, 2021, 9:11 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - राज्यातील जनतेची विजबील बाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा सचिव तसेच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध 420 कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे.

लॉकडाऊन काळात वाजवीपेक्षा जास्त बील

कोरोना महामारीमुळे देशात चार महिने कडक टाळेबंदी होती. या काळात महावितरण कंपनीकडून वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधीच आला नव्हता. मात्र, लोकडाऊन असल्यामुळे त्याकाळात नागरिक घरीच होते. त्या कालावधीतील वीजबील वाजवीपेक्षा जास्त म्हणजेच तीन ते पाच पटीने विद्युत बिल दिली आहे. नागरिकाकडून वीज बिल भरणे शक्य नाही. त्याकाळातील वीज बिल माफ करा, अशी मागणी मनसेने केली.

ऊर्जा मंत्र्यांकडून वीज बिलाबाबत जनतेची फसवणूक

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काळातील वीजबिल माफ करेल व तसेच सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरसकट वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद केला जाईल, असा जीआर काढला आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांनी वीज बिलवरून जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केला आहे.

मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

वीज ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने तक्रार केली आहे. तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुन्हा दाखल न झाल्यास तहसीलकार्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.