पंढरपूर - कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूरसह पाच तालुक्यात 13 ऑगस्टपासून संचारबंदी जाहीर केली आहे. पंढरपूर शहरातील व्यापारी महासंघाकडून संचारबंदीला तीव्र विरोध होत आहे. संचारबंदीला विरोध करण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले. दुसऱ्या दिवशी व्यापारी महासंघाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन केले. व्यापारी महासंघाला मनसेसह अन्य संघटनेनी पाठिबा दिला आहे.
हेही वाचा - सीमा भागावर होणारा अन्याय तत्काळ थांबवावा, अजित पवारांचे मोदींना पत्र
संचारबंदीला पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा विरोध -
पंढरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 13 ऑगस्टपासून शहरात संचारबंदी लागू केली आहे. गेल्या दीड वर्षापासून आर्थिक मंदीमुळे पंढरपुरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संचारबंदी तीव्र विरोध केला आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा व व्यापार्यांना दुकाने खुले करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 10 ऑगस्ट रोजी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी चौक येथे व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आज अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला.
पंढरपूर व माळशिरस तालुक्यात तीन हजार कोरोना रुग्णांवर उपचार-
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे पंढरपूर येथे आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. पंढरपूर, माळशिरस, सांगोला व करमाळा तालुक्यात तिसऱ्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यात तीन हजार कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या तीन महिन्यापासून विठ्ठल मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, पंढरपुरात भाविकांची येणारी संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा - मुंबईसह पाण्यात बुडणार 12 शहरं; NASA चा धडकी भरवणारा रिपोर्ट