सोलापूर - एका जन्मदात्यानेच आपल्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपी जन्मदात्यासोबत इतरही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृताचे वडील सुरेश सिध्दलिंग घोडके (वय - 62 वर्षे, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), संजय उर्फ भोजु राठोड (वय - 28 वर्षे, रा. मुळेगाव, हल्ली रा. आशानगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (वय - 47 वर्षे, रा. सेवालालनगर, रा. मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
गेल्या 29 जानेवारीला कुंभारी शिवारातील सोलापूर ते अक्कलकोट रस्त्यावर जमादार वस्तीसमोर एक अनोळखी पुरूष (वय - अंदाजे 38 वर्ष) बेशुध्द अवस्थेत मिळून आला होता. त्याला उपचाराकरीता शहर सरकारी रूग्णालयात येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदनात मृताचा गळा दोरीने आवळून मृत्यू झाल्याचे निदर्शनात आल्याचे आढळले होते. यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध 30 जानेवारीला वळंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वामीराव चनबसप्पा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - गतिमंद महिलेवर बलात्कार करणारे नराधम जेरबंद
यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना त्याचेकडील पथक कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोनि सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी याचे पथक अज्ञात आरोपीच्या मागावर ठेवले. यात मृत शैलेश घोडके हा घरात सर्वांना अतोनात त्रास देत होता. त्या त्रासास कंटाळून त्याचे वडील सुरेश घोडके यांनी सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याचे ओळखीचे शंकर वडजे आणि राहुल राठोड यांना मुलास जीवे ठार मारण्याकरीता सुपारी दिली होती, अशी माहिती त्यांना मिळाली.
तर मृताचे नाव शैलेश सुरेश घोडके (वय - 31 वर्ष, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) असे असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोनि सावंत तसेच सहायक पोलीस निरीक्षक आवटे आणि कर्मचारी गुरूवारी 13 फेब्रुवारीला मृताचे वडील सुरेश सिद्धलिंग घोडके व शंकर नारायण वडजे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशी केली असता त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांचा त्यांच्यावर संशय वाढला. यानंतर पोलिसांनी त्यांना अधिक विश्वासात घेत विचारपूस केली असता, मृताचे वडिलांनी सांगतले, मृत शैलेश घोडके हा काही कामधंदा करत नव्हता. तो घरातील लोकांना अतोनात त्रास देत होता. वडील यांना जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ तसेच दमदाटी करत होता. आम्ही त्यास वैतागून गेलो होतो, म्हणून त्याला जीवे ठार मारण्याकरीता त्याचे शेता शेजारील शंकर वडजे आणि त्याचे इतर साथीदार यांना खूनाची सुपारी दिली, अशी कबूली दिली. तर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज