ETV Bharat / state

Pandharpur Crime News : वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोलने जाळला मृतदेह - Father Body Burnt With Petrol in Pandharpur

पंढपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्याला बापाला स्वत:च्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची (Father Body Burnt With Petrol in Pandharpur) दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना (Pandharpur Murder Case) घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलांसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक (Son Arrested in Murder Case) केली आहे. सोहेल बागवान असे आरोपी मुलांचे नाव आहे.या घटनेनंतर पंढरपुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pandharpur Crime)

Father Body Burnt With Petrol in Pandharpur
मुलाकडून वडिलांची हत्या
author img

By

Published : Jan 1, 2023, 5:29 PM IST

सोलापूर : या बाबत सविस्तर वृत्त असे की,लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु त्यांच्या लग्नास सोहेल चे वडील अफजल बागवान यांचा विरोध होता. (Pandharpur Murder Case) दरम्यान, अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुर येथे आले. तेव्हा त्यांनी पंढरपूर येथील नवीन एसटी बस स्थानक समोर सोहेल बागवान यांची भेट घेतली. (Son Arrested in Murder Case) त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने तहसील कार्यालया जवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले. (Father Body Burnt With Petrol in Pandharpur)

Father Body Burnt With Petrol in Pandharpur
मयत अफजल बागवान

असा केला खून : पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून अफजल यांच्या डोळ्यात चटणी टाकली. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तिच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून हत्या केली. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.