ETV Bharat / state

व्यापारी सूड उगवताहेत..? शेतकऱ्याने २१ गोणी कांदा विकूनही उलट आडत्यालाच दिले १३३ रुपये

गेल्या आठवड्यात कांद्याला ४० रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गाला मोठा आनंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकण्यासाठी गर्दी केली होती.

कांदा
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:29 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकवीस गोणी कांदा विकल्यानंतर चक्क कांदा घेणाऱ्या आडत्यालाच १३३ रुपये देण्याची वेळ आली आहे. त्याचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. उलट जवळचे पैसे गेले. निसर्गाने अन्याय तर केलाच मात्र, व्यापाऱ्यांनीही आपला सूड उगवल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

farmers are in trouble due to lowest onion rates
शेतकऱ्याने २१ गोणी कांदा विकूनही उलट आडत्याला दिले १३३ रुपये

गेल्या आठवड्यात कांद्याला ४० रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गाला मोठा आनंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकण्यासाठी गर्दी केली होती. करमाळा येथील शेतकरी राहुल गव्हाणे यांनी आपल्या शेतातील एकवीस गोणी कांदा बाजारसमितीमध्ये विकण्यासाठी आणला होता. कांद्याला चांगला दर मिळाला, तर ते गावाकडे जाताना सोलापूरवरून कुटुंबीयांसाठी कपडे घेऊन जाणार होते. मात्र, कांद्याची पट्टी त्यांच्या हातात मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. त्यांचा कांदा २ रुपये किलो दरापेक्षा जास्त दराने विकू शकला नाही. ३ गोण्या तर फुकटच द्याव्या लागल्या. मात्र, गाडीचे भाडे, हमाली, तोलाई, वारणी असा इतर खर्च १ हजार ४७६ रुपये झाला. मात्र, २१ गोणी कांद्यापासून त्यांना फक्त १ हजार ३४३ रुपये मिळाले. बेरीज वजाबाकीचे गणित झाल्यानंतर त्यांना स्वत: जवळचे १३३ रुपये आडत दुकानदाराला देण्याची वेळ आली. मात्र, दुकानदाराने शेतकऱ्याकडून पैसे घेतले नाही. तरीही मी कांद्याचे उत्पादन का घेतले? हा प्रश्न सतत गव्हाणे यांना सतावत होता.

परतीच्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. करमाळा भागात जास्त करून कांद्याचे पीक आहे. मात्र, पावसाने काही शेतकऱ्यांना कांदा पीक शेतातून काढता आले नाही. त्यामुळे पीक शेतातच सडले आहे, तर काढलेल्या कांद्याला नाममात्र भाव मिळत आहे. लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे.

शेतकरी नेते मूग गिळून गप्प -
एरवी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे नेतेमंडळी मात्र कोठेच दिसेनासे झाले आहेत. काही व्यपाऱ्यांच्या हुशारीमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यांना जरब बसणे गरजेचे आहे. नेतेमंडळी फक्त ऊसासाठीच आंदोलन करताना दिसून येत आहेत. त्यासाठी उठाव होणे गरजचे आहे. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत असताना हे नेतेमंडळी मात्र कोठेही दिसून येत नाहीत. फक्त आपल्या नावापुढे पद लावण्यातच यांना धन्यता दिसून येत असल्याचा संताप शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.

Intro:Body:करमाळा - कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला आडत दुकानदाराला १३३ रुपये देण्याची वेळ.
चिखलठाण ता करमाळा येथील शेतकरी.

Anchor - करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकवीस गोणी कांदा विकल्यानंतर चक्क कांदा घेणाऱ्या आडत्यालाच १३३ रुपये देण्याची वेळ आली असून निसर्गाने तर अन्याय केलाच असताना शेतकऱ्यावर व्यापाऱ्यांनाही आपला सूड उगवत आहेत. अशीच भावना शेतकरी वर्गांमधुन व्यक्त केली जात आहे.
मागच्या आठवड्यात कांद्याला चाळीस रूपये दर मिळाला हे ऐकून सर्व शेतकरी वर्गालाच मोठा आनंद झाला होता. ज्याच्या शेतात कांदा होता तो आपण लखपती करोडपती होणार असल्याची स्वप्ने पाहत होता. आणि केवळ चारच दिवसात या स्वप्नांची इमारत ढासळलेली आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाहण्यास मिळाली.

Vo - चिखलठाण तालुका करमाळा येथील शेतकरी राहुल गव्हाणे यांनी आपल्या शेतातील वीस गोणी एकवीस गोणी कांदा सोलापूर मार्केट यार्ड मध्ये विकण्यासाठी आणला होता. कांद्याला चांगला दर मिळाला तर ते गावाकडे जाताना सोलापूर वरून येथिल खास प्रसिद्ध असलेली चादर व कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी इतर कपडे घेऊन ते गावाकडे जाणार होते. परंतु कांद्याची पट्टी त्यांच्या हातात मिळाली आणि त्यांना धक्काच बसला त्यांचा कांदा दोन रुपये किलो दरापेक्षा जास्त दराने विकू शकला नाही. तीन गोण्या तर फुकटच द्याव्या लागल्या परंतु गाडी भाडे हमाली, तोलाई, वारणी, असा इतर खर्च १४७६ रुपये झाला आणि २१ गोणी कांद्यापासून त्यांना १३४३ रुपये मिळाले. बेरीज वजाबाकीचे गणित झाल्यानंतर त्यांना स्वत: जवळचे १३३ रुपये आडत दुकानदाराला देण्याची वेळ आली. आडत दुकानदार भला माणूस निघाला त्याने त्या शेतकऱ्या कडून पैसे घेतले नाही परंतु सोलापूरवरून गावाकडे येताना त्यांच्या मनात एकच विचार येत होता मी कांदा का लावला होता.याच उत्तर मला मिळेल का?

परतीच्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान-
पावसाळा संपला तरी आजही पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. करमाळा भागात जास्त करून कांद्याचे पीक आहे. पण पावसाने काही शेतकऱ्यांना कांदा पीक शेतातून काढता आले नाही त्यामुळे पीक शेतातच सडले आहे. तर काढलेल्या कांदा पिकाला मात्र नाममात्र भाव मिळत आहे. लागवणीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला थोडाफार तरी मदतीचा हात लाभेल.

शेतकरी नेते मूग गिळून गप्प-
एरवी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे नेतेमंडळी मात्र कोठेच दिसेनात असे झाले आहे. काही व्यपाऱ्यांच्या चलाखीने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. हक करे सो कायदा या आविर्भावात व्यापारी वागताना दिसून येतात. त्यांना जरब बसणे गरजेचे आहे. नेतेमंडळी फक्त ऊसा साठीच आंदोलन करताना दिसून आले आहेत. त्यासाठी उठाव होणे गरजचे आहे. आता पूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकरी अडचणीत असताना हे नेतेमंडळी मात्र कोठेही दिसून येत नाहीत. फक्त आपल्या नावापुढे पद लावण्यातच यांना धन्यता दिसून येते.

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.