ETV Bharat / state

Farmer Dies Due to Electric Shock : पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Pandharpur Taluka

पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथे नागेश शंकर आसबे (वय 45) ( Died Nagesh Shankar Aasbe ) यांचे शेतातील मोटार चालू करताना विजेच्या धक्क्याने ( Electric Shock ) मृत्यू झाल्याची ( Farmer Dies Due to Electric Shock ) घटना घडली आहे. शेतातील विद्युत मोटर सुरू करायला गेले असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Farmer Died Nagesh Shankar Aasbe
शेतकरी नागेश शंकर आसबे
author img

By

Published : Aug 6, 2022, 2:00 PM IST

पंढरपूर/सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील नागेश शंकर आसबे (वय 45) ( Died Nagesh Shankar Aasbe ) यांचा विजेचा धक्का ( Electric Shock ) बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील विद्युत मोटर सुरू करायला गेले असताना विजेचा धक्का लागल्याने ( Farmer Dies Due to Electric Shock ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता घडली. खरसोळी येथील नागेश आसबे हे आपल्या शेतातील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजता गेले असताना विद्युत मोटरीच्या पेटीचे कुलूप उघडत असताना खांबावरून पेटीमध्ये येणारी वायर शॉर्ट झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झाला.

रात्री आठ वाजता समजले : नागेश आसबे हे दुपारी दोन वाजता शेतात गेले असता रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचे बंधू लहान बंधू रमेश नागेश यांचा शोध घेण्यासाठी गेले असता शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी आणि चप्पल आढळून आली. तेव्हा शेताच्या बांधावरून खाली जात पाहिले असता नागेश हे विजेचा धक्का लागून पडल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरा पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.

संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा : शनिवार पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागेश यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण खरसोळी गावावरती शोककळा पसरली आहे. नागेश आसबे हे खरसुळी विविध सेवा सहकारी सोसायटीचे दहा वर्षे चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई -वडील भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा : Emitted Polluted Ash : राखमिश्रित पाणी ठरतेय आरोग्याला हानिकारक; परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.