ETV Bharat / state

पंढरपुरात मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे महाराज मंडळी, व्यापाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत - विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुन्हा सुरू

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. मार्चपासून बंद असलेले मंदिर आता खुले होणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. मंदिर खुले करताना कोरोना महामारी रोखण्यासाठीही मंदिर प्रशासनही सज्ज झाले आहे. मंदिर प्रशासनाची रविवारी याबाबत बैठक होणार आहे.

पंढरपूर
पंढरपूर
author img

By

Published : Nov 14, 2020, 10:13 PM IST

पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. विठ्ठल मंदिर सुरू होत असल्यामुळे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राज्यातील इतर मंदिरांपेक्षा विठ्ठल मंदिर पूर्णतः वेगळे आहे. विठ्ठल मंदिराला पदस्पर्श व मुखदर्शनाची परंपरा आहे. मात्र, सोमवारी सुरू होणाऱ्या विठ्ठल दर्शनाबाबत पदस्पर्श दर्शन व मुखदर्शन चालू होणार हा प्रश्न महाराज मंडळी उपस्थित करत आहे.

पंढरपुरात मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे महाराज मंडळी, व्यापाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

विठ्ठल मंदिर प्रशासन सज्ज

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. मार्चपासून बंद असलेले मंदिर आता खुले होणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. मंदिर खुले करताना कोरोना महामारी रोखण्यासाठीही मंदिर प्रशासनही सज्ज झाले आहे. मंदिर प्रशासनाची रविवारी याबाबत बैठक होणार आहे. त्यामध्ये दर्शन मंडप, सभा मंडप यांची देखरेख काम मंदिर समितीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. तसेच मंदिर उघडल्यानंतर भाविकांना कोणत्या प्रकारे सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापर, वारकरी व भक्तांना मंदिर समितीकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीला याबाबत कोणताही अहवाल राज्य सरकारकडून मिळाला नसल्यामुळे विठ्ठल दर्शन पदस्पर्श मुखदर्शन होणाऱ्या बाबतीत अजूनही शंका आहे.

विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत

विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी फटाके व मिठाई वाटून राज्य सरकारच्या मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची या निर्णयाचे स्वागत केले आहे. पंढरपुरातील प्रदिक्षणा रोड, नामदेव पायरी, कालिका देवी चौक, महाद्वार रोड, चौफाळा या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानासमोर फटाके वाजून आपला आनंद व्यक्त केला. विठ्ठल मंदिर खुले झाल्यामुळे पंढरीच्या अर्थचक्राला एक प्रकारे गती मिळणार आहे. गेल्या महिन्यापासून विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची स्थिती नाजूक झाली होती मंदिर खुले झाल्यामुळे पंढरीत हजारो वारकरी व भक्त दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे या निर्णयामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील चुरमुरे, प्रसाद, पेढे, हळदी, कुंकू, बुक्का या व्यापाऱ्यांच्या मोडकळीस आलेली आर्थिक नाडी सर होणार आहे.

वंचितकडून मुख्यमंत्र्यांचे निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राज्यातील सर्व मंदिरे, मशीद यासह अन्य धार्मिक स्थळे उघडली जाणार आहेत. 'वंचित'च्या वतीने पंढरपूर येथील नामदेव पायरी समोर फटाके वाजवून मुख्यमंत्र्यांचे निर्णयाचे स्वागत केले, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.