ETV Bharat / state

सोलापुरात ऑक्सिजनचा पुरेसा साठा - पालकमंत्री भरणे - सोलापूर ऑक्सीजन बातमी

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते शुक्रवारी (दि.4 सप्टें) आढावा बैठकीत बोलत होते.

bharne
बैठकीतील छायाचित्र
author img

By

Published : Sep 5, 2020, 10:56 PM IST

सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. त्याचबरोबर अधिकची मागणी लक्षात घेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (दि.4 सप्टें) आढावा बैठकीनंतर माध्यमांना दिली.

पालकमंत्री भरणे यांनी शुक्रवारी दिवसभर विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतल्या तसेच कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, डॉ.शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात फक्त दोनच प्रकल्पातून ऑक्सिजन उत्पादन होते. त्यांची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला एक प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध होईल. याशिवाय पुणे आणि कर्नाटकातूनही ऑक्सिजन आणता येईल का याबाबत प्रयत्न सुरु आहेत.

भरणे यांनी बैठकीत औषधे आणि इतर अनुषांगिक साहित्याची मागणी अगोदरच करा, अशा सूचना सहाय्यक अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल आणि डॉ.अग्रजा वरेरकर-चिटणीस यांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात शंभर खाटांचा आणखी एक कक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.

सोलापूरच्या विकासाबाबतच्या प्रश्नांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपा‍लिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व विभागाशी निगडीत प्रश्नाबाबत व्यापक चर्चा केली जाईल. यामध्ये सर्वांना सहभागी केले जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

हेही वाचा - मटका बुकी प्रकरण : बडतर्फ पोलीस शिपाई स्वामीसह 28 जणांना जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.