ETV Bharat / state

पंढरीतील विठुरायाच्या चरणी पाऊण कोटींचे दान - pandharpur Devotee news

विठुरायाच्या चरणी भाविकांनी 74 लाखाचे दान अर्पण केले. ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर 74 लाख रुपयांचे दान जमा झाले असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

vitthal
vitthal
author img

By

Published : Dec 31, 2020, 12:30 PM IST

Updated : Dec 31, 2020, 12:53 PM IST

पंढरपूर - पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली होती. आठ महिने राज्यातील मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरामध्ये देणग्यांमध्ये मोठी घट झाली होती. 16 नोव्हेंबरपासून पंढरपूर येथील विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्यापासून विठ्ठल मंदिर समितीच्या देणगीमध्ये वाढ होऊ लागली आहे. विठुरायाच्या चरणी भाविकांनी 74 लाखाचे दान अर्पण केले. ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर 74 लाख रुपयांचे दान जमा झाले असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

विठ्ठलाच्या दरबारी भाविकांची गर्दी

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरपासून विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्याने देणगीमध्येही वाढ होऊ लागली आहे. लॉकडाउननंतर श्री विठ्ठलाचे द्वार मुखदर्शनासाठी खुले झाल्यानंतर आता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे आता उत्पन्नातदेखील समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. पंढरपूर रोज हजारो भाविक दाखल होत आहेत. विठुरायाच्या मुखदर्शनाचा लाभ ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना मिळताना दिसत आहे. मात्र ज्या भाविकांना मुखदर्शन घेता येत नाहीत, ते भाविक विठ्ठल मंदिराच्या कळसाचे किंवा नामदेव पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत. विठ्ठल मंदिर समितीकडून मुखदर्शन घेणाऱ्यांची संख्या 4, 800 करण्यात आली आहे. दोन महिन्यापासून 70 हजार भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

नववर्षाच्या निमित्ताने पंढरपुरात गर्दीची शक्यता

नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून कोरोना महामारी पार्श्वभूमीवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा कोरोनामुळे देणगी कमी असली तरी दहा महिन्यांनंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. नववर्षाच्या निमित्ताने सुद्धा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

१६ नोव्हेंबरपासून पंढरपूर आणि साईबाबांच्या चरणी झालेले दान

पंढरपूरच्या देवस्थानास ७४ लाख तर शिर्डी येथील साई मंदिरास ३ कोटी १६ लाख ८३ हजार ९८० रुपये रोख स्वरुपात जमा झाले आहे. याशिवाय ९३ ग्रॅम सोने, ३८०८ ग्रॅम चांदी भक्तांनी साईचरणी अर्पण केले आहे. मागील १४ दिवसांत साईंच्या दरबारात अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली.

Last Updated : Dec 31, 2020, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.