ETV Bharat / state

Ranjitsinh Disale : डीसले गुरुजींचे झेडपी सीईओंना पत्र; चौकशी अहवाल व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी - चौकशीचा गोपनीय अहवाल

रणजितसिंह डीसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्या चौकशीचा गोपनीय अहवाल (दस्तऐवज) (Confidential Report of Inquiry) समाजमाध्यमांपर्यंत पोचला. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी अहवाल लीक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी (Demand action against those who made investigation report viral) व्हावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्राद्वारे (Disale Guruji letter to ZP CEO) केली आहे.

Ranjitsinh Disale
रणजितसिंह डीसले गुरुजी
author img

By

Published : Aug 3, 2022, 3:31 PM IST

सोलापूर : रणजितसिंह डीसले (Ranjitsinh Disale) यांच्या बाबत पाच सदस्यीय समितीने, सखोल चौकशी करून त्याचा स्वतंत्र अहवाल तयार केला होता. तो चौकशीचा गोपनीय अहवाल (दस्तऐवज) (Confidential Report of Inquiry) समाजमाध्यमांपर्यंत पोचला कसा? शिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ती गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी अहवाल लीक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी (Demand action against those who made investigation report viral) व्हावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्राद्वारे (Disale Guruji letter to ZP CEO) केली आहे.

डीसले गुरुजींना वगळुन, अहवाल सोशल मीडियावर व्हायरल : तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी नेमलेल्या समितीने, रणजितसिंह डिसले गुरुजींची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती असतानाही ते तिकडे गेले नसल्याबद्दल चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमून चौकशी केली. त्या समितीच्या मागणीनुसार डिसले गुरुजींनी खुलासा सादर केला होता. त्याचवेळी त्यांनी दोनवेळा अर्ज करून चौकशी समितीच्या अहवालाची मागणी केली होती. त्यांना तो अहवाल दिला गेला नाही. मात्र हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हाच धागा पकडून डिसलेंनी सीईओंना लिहिलेल्या पत्रात ती खंत मांडली आहे. चौकशी अहवाल मी मागितला असता, मला दिला नाही आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. गोपनीयतेच्या कायदा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी डिसलेंनी पत्रातून केली आहे.

8 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय होणार :
रणजितसिंह डिसले यांनी ७ जुलै 2022 रोजी आपला राजीनामा गटशिक्षणाधिकारी माढा येथे दिला होता. प्रोटोकॉल नुसार हा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे आला आहे. महिनाभरात त्यांना राजीनामा मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेता येऊ शकतो. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नामंजूर? ते स्वत:हून राजीनामा मागे घेतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर ८ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे.

हेही वाचा : Axel killed in Kashmir : सैन्यदलाच्या एक्सल श्वानाचा गोळी लागून काश्मीरमध्ये मृत्यू, दहशतवादी विरोधी मोहिमेत होता सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.