ETV Bharat / state

माळशिरस येथे धनगर समाजाचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

७० वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडला आहे, धनगड आणि धनगर या शब्दांमधील गोंधळामुळे आरक्षणाचा वनवास सुरू आहे तो संपवा, अशी मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

author img

By

Published : Sep 26, 2020, 2:58 PM IST

धनगर समाज आंदोलन
माळशिरस येथे धनगर समाजाचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

सोलापूर - पंढरपूर एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाचं रणशिंग फुंकलं. माळशिरस तालुक्यात अजित बोरकर यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले

आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले. ७० वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडला आहे, धनगड आणि धनगर या शब्दांमधील गोंधळामुळे आरक्षणाचा वनवास सुरू आहे तो संपवा, अशी मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून धनगर समाजाचे बांधव ढोल वाजवत आंदोलन स्थळाकडे येऊन भंडाऱ्याची उधळण करत आणि धनगरी नृत्य करत आंदोलनात सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.