ETV Bharat / state

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरामध्ये दाखल; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न - Kartiki Ekadashi

पंढरपूरमध्ये सध्या कार्तिकी एकादशीचा सोहळा सुरू असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) व अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त ( Kartiki Ekadashi) पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा आज पहाटे संपन्न ( Official Mahapuja completed ) झाली.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 4, 2022, 6:46 AM IST

सोलापूर ( पंढरपूर ) : पंढरीच्या वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. पंढरपूरमध्ये सध्या कार्तिकी एकादशीचा ( Kartiki Ekadashi ) सोहळा सुरू असून, कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) व अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा आज पहाटे संपन्न ( Official Mahapuja completed ) झाली.

गेल्या पन्नास वर्षांपासून करतात पंढरपूरची वारी :शासकीय महापूजा संपन्न होत असताना उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून दर्शन रांगेतील मानाचे वारकरी श्री उत्तमराव माधवराव साळुंखे व सौ कलावती उत्तमराव साळुंखे यांना यावर्षी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. साळुंखे दांपत्य हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील असून गेल्या पन्नास वर्षांपासून ते पंढरपूरची वारी करतात.

कर्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न : पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा आहे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते कर्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली. देवेंद्र फडणवीस असे उपमुख्यमंत्री आहेत की, ज्यांना आषाढी एकादशीची व कार्तिकी एकादशीच्या दोन्हीही शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. शासकीय महापूजा वेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गाहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.