ETV Bharat / state

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी

author img

By

Published : Nov 24, 2019, 5:05 PM IST

माढा शहराला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त करुन देणारे राजे रावरंभा निंबाळकर यांची २८३ वी पुण्यतिथी माढा शहरात प्रथमच साजरी करण्यात आली. नगरसेवक आणि शहरवासियांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी आकर्षक फुलांची आरास समाधीस्थळी करण्यात आली होती.

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी

सोलापूर - माढा शहराला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त करुन देणारे राजे रावरंभा निंबाळकर यांची २८३ वी पुण्यतिथी माढा शहरात प्रथमच साजरी करण्यात आली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आणि नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या पुढाकारातून शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला.

शहरातील साठे गल्ली प्रभागात असलेल्या रावरंभाराजे निंबाळकर यांच्या समाधी स्थळी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसेवक आणि शहरवासियांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी आकर्षक फुलांची आरास समाधी स्थळी करण्यात आली होती.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा साठे म्हणाल्या, रावरंभा निंबाळकर राजेंचे माढ्यासाठी मोठे योगदान असून त्यांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. यासोबतच यापुढे दरवर्षी पुण्यतिथी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी

माढ्याची जहागिरी असलेल्या राजे निंबाळकर यांच्या निधनाची पेशवे दप्तरात तिथीनुसार तारीख इतिहास संशोधक प्रा.सतिश कदम यांना संशोधनातुन सापडली आहे. प्रा. कदम हे रावरंभा निंबाळकर राजेच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहित आहेत. साठे गल्लीत असलेल्या रावरंभा निंबाळकर राजेंच्या समाधी स्थळाचे लवकरच सुशोभिकरण करणार असून समाधी स्थळी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांनी यावेळी सांगितले.

Intro:Body:प्रतिनिधी | माढा
माढा शहराला ऐतिहासिक दृष्ट्या महत्व प्राप्त करुन देणारे राजे रावरंभा निंबाळकर यांची २८३ वी पुण्यतिथी माढा शहरात प्रथमच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे,नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या पुढाकारातुन शुक्रवारी साजरी झाली.

शहरातील साठे गल्ली प्रभागात असलेल्या रावरंभाराजे निंबाळकर यांच्या समाधी स्थळी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या हस्ते नगरसेवक व शहरवासियांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.या वेळी निंबाळकर यांच्या समाधी स्थळी आकर्षक फुलांची आरास समाधी स्थळी करण्यात आली होती.
नगराध्यक्षा साठे यांनी बोलताना,रावरंभा निंबाळकर राजेंचे जीवनचरित्र अभ्यासून त्यांचे माढ्यासाठी मोठे योगदान असुन त्यांचा अभिमान बाळगणे गरजेचे असल्याचे सांगतानाच दरवर्षी या पुढे पुण्य तिथी साजरी करणार असल्याचे मत व्यक्त केले.या प्रसंगी मुख्याधिकारी चरण कोल्हे,नगरसेविका
अनिता सातपुते,नगरसेवक राहुल लंकेश्वर,गंगाराम पवार,विजय सातपुते,हनुमंत राऊत,नाना साठे,सागर नवले,दादा बरडे,समाधान अंबुरे आदी उपस्थित होते.भुमाता शेतकरी संघटनेचे संतोष जगदाळे यानी समाधीची स्वच्छता करुन अभिवादन केले.दिवसभर शहरवासियांनी समाधी स्थळी येऊन पुष्पांजली वाहून दर्शन घेतले.माढ्याची जहागिरी असलेल्या राजे निंबाळकर यांच्या निधनाची पेशवे दप्तरात तिथी नुसार
तारिख इतिहास संशोधक प्रा.सतिश कदम यांना संशोधनातुन सापडली आहे.प्रा.कदम हे रावरंभा निंबाळकर राजेच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहित आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई यांचे निंबाळकर हे नातु होते.माढा शहराचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीचे मंदीर,कसबा पेठेतील श्री विठ्ठल मंदिर,निंबाळकर राजांचा किल्ला या ऐतिहासिक वास्तूची उभारणी करुन त्यांनी माढ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त करुन दिले आहे.या अगोदर समाधी स्थळी माढा रियासत संघाच्या वतीने दिपोत्सव करण्यात आला होता.

चौकट-निंबाळकर यांचे फार मोठे योगदान माढ्यासाठी लाभलेले असुन त्यांचे स्मरण कायम माढेकरांच्या मनात राहिलच.साठे गल्लीत असलेल्या रावरंभा निंबाळकर राजेच्या समाधी स्थळाचे लवकरच सुशोभिकरण करणार आहे.समाधी स्थळी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांनी यावेळी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.