सोलापूर - करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी हालचालींला वेग आला आहे. कारखान्यातील सर्व कामगारांची एक आढावा बैठक आदिनाथ सहकारी कारखान्याच्या आवारात घेण्यात आली. या बैठकीत कारखाना सुरू होण्याआधी कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केली आहे.
कारखाना सुरू होण्याआधी कामगारांचे प्रश्न सोडवा
आदिनाथ सहकारी साखर कारखाना कोण चालवणार, कामगारांच्या थकित पगार कोण देणार, किती कामगारांना कामावर ठेवणार या सर्व प्रश्नांची समिक्षा करण्यासाठी ही समिक्षा बैठक आयोजित केली होती. आज तुमच्या चेहऱ्यावर हसुसुध्दा तुम्हाला नकली आणावे लागत आहे. तालुक्यामध्ये कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेते फिरत आहेत. परंतु यापैकी किती लोकांनी तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी तुमची भेट घेतली आहे?, असा सवाल शरथ कांबळे यांनी केला आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!