ETV Bharat / state

माघी एकादशीला पंढरपुरात संचारबंदी; एसटी सेवा राहणार सुरळीत - पंढरपूर संचारबंदी न्यूज

पंढरपूरला 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान माघी एकादशी सोहळा होणार आहे. मात्र, याकाळात मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून शहरात संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

Vitthal Rukmini
विठ्ठल-रुक्मिणी
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:22 AM IST

सोलापूर(पंढरपूर) - माघी एकादशी निमित्त 23 फेब्रुवारीला पंढरपूरमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहर व आसपासच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माघी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. मात्र, यादरम्यान एसटी सेवा सुरळीत राहणार आहे.

एकादशीच्या दिवशी भाविकांना प्रवेशबंदी -

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा माघी एकादशी सोहळा 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर येथे पार पडणार आहे. या दिवशी पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह शेगाव दुमाळे, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, गादेगाव, कोर्टी, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे या गावांमध्ये संचारबंदी असणार आहे. या काळात पंढरपूरमध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच धर्मशाळा, मठ, लॉज या ठिकाणी व्यक्तींना राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या काळात आपत्कालीन व्यवस्था सुरू राहणार आहे.

एसटी सेवा राहणार सुरू -

पंढरपूर शहरासह दहा गावात एकादशी दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, पंढरपूर येथील एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना विठ्ठल मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत एसटी प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

विठ्ठल मंदिरातील दर्शन दोन दिवस बंद -

विठ्ठल मंदिर समितीने माघी एकादशी व द्वादशी या दिवशी विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 22 व 23 फेब्रुवारीला विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन बंद राहिल. 24 फेब्रुवारीला मुखदर्शन सुरळीत करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात विठ्ठलाची नित्यपूजा सुरूच राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.