ETV Bharat / state

पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांची पडझड, स्वाभिमानीकडून पंचनामे करण्याची मागणी - Solapur district news

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात शनिवारी (दि. 15 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्षांनी केली आहे.

नुकसान
नुकसान
author img

By

Published : May 16, 2021, 8:23 PM IST

Updated : May 16, 2021, 8:55 PM IST

माळशिरस (सोलापूर) - तौक्ते चक्रीवादळामुळे सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन शनिवारी (दि. 15 मे) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. मात्र, यामुळे फळ शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेती बागाचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माळशिरस स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

बोलताना शेतकरी व तालुकाध्यक्ष

मान्सूनपूर्व पावसामुळे माळशिरस तालुक्यातील फळबागांचे नुकसान

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात एक जूनपर्यंत सरकारने संचारबंदी लागू केली आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा राज्य सरकारने बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कोणत्याही प्रकारची भाव मिळताना दिसत नाही. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने माळशिरस तालुक्यात शनिवारी अचानक हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील केळी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसत आहे. माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील शेतकऱ्याने साडेतीन एकर शेत जमिनीवर केळी बागाची लागवड केली होती. मात्र, शनिवारी आलेल्या पावसामुळे केळी बाग पूर्णपणे झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या केळी बागाचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.

पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब बागांची पडझड

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, माढा तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब बागांचे मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळ बागा या काढणीसाठी आली होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंब व द्राक्ष पिके खराब झाली आहेत.

शेतकरी संघटनेची नुकसान भरपाई देण्याची मागणी

मान्सूनपूर्व पावसामुळे माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारामध्ये कवडीमोल किंमत मिळत आहे. त्यात हातातोंडाशी आलेल्या केळी बागेचे मान्सूनपूर्व पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांची नुकसान झालेल्या शेत फळबागांची राज्य सरकारकडून पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी केले.

हेही वाचा - कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी शहरातील बालरोग तज्ञांची स्थानिक प्रशासनासोबत बैठक

Last Updated : May 16, 2021, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.