ETV Bharat / state

सोलापुरात भाजी विक्रेत्यांना कोविड टेस्ट बंधनकारक

सोलापूर शहरातील भाजी विक्रेते,फळ विक्रेत्यांसह फेरीवाल्याना व किराणा दुकान धारकांना कोविड- 19 ची टेस्ट करणे बंधनकारक केले आहे. असे आदेश महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिले आहेत.

Covid test
कोविड टेस्ट
author img

By

Published : Oct 24, 2020, 8:05 AM IST

सोलापूर- शहरातील भाजी विक्रेते,फळ विक्रेत्यांसह फेरीवाल्याना व किराणा दुकान धारकांना कोविड- 19 ची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी या बाबतचे आदेश काढले आहेत. अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

धनराज पांडे उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका

सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा फैलाव व वाढती रुग्ण संख्या याचा अभ्यास करून भाजीविक्रेते,फळविक्रेते, किराणा दुकानधारक, हातगाडी वाले, फेरीवाले यांना कोविड -19 ची रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विक्रेत्यांचा अहवाल निगेटीव्ह असणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना विषाणूच्या फैलाव रोखता येईल. विक्रेत्यानी कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे ग्राहकाला विश्वासाने खरेदी करता येईल व कोरोनाचा संसर्ग रोखता येणे सोपे होईल.

शहरात रूग्ण संख्या आजपर्यंत 9 हजार 366 झाली आहे. तर मृतांची संख्या 524 इतकी आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 278 इतकी आहे. शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी सोलापुरात कोरोना विषाणूची लागण झालेले 20 रुग्ण नव्याने आढळून आले आहे. यामध्ये 11 पुरुष व 9 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरात एकूण 281 रुग्णांचे कोविड अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 261 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अन्यथा विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार

पुढील १० दिवसांच्या आत स्वतःची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. जे विक्रेते तपासणी करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची व ५०० रुपयांचा दंड किंवा प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा आदेशही महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.