पंढरपूर - राज्यातील नद्यांना जलयुक्त शिवारामुळे संजीवनी मिळणार होती. राज्यातील नद्यांच्या मृतक साठ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार होती. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये ठेकेदारांचा समावेश केल्याने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केला आहे. जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा हे पंढरपुरात खासगी कामासाठी आले होते.
'जलयुक्त शिवार ही महत्त्वाची योजना' -
राज्यातील पाणी संवर्धनासाठी जलयुक्त शिवार ही एक उपयुक्त अशी योजना होती. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून देणे हा महत्त्वाचा उद्देश होता. राज्यातील बहुतांश जलसाठे मृत अवस्थेत गेले होते. त्यांना संजीवनी देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आखण्यात आली होती. मात्र, त्यात राज्य सरकारने मानवी साखळी निर्माण करण्याची गरज होती. जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांना काम दिले. त्यात भ्रष्टाचाराला मोकळीक मिळाली. त्यातून ठेकेदारांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप जलतज्ञ राणा यांनी केला.
'जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांनी लाभ पाहिला' -
जलयुक्त शिवार ही राज्यातील महत्त्वकांक्षी योजना होती. मात्र या योजनेत ठेकेदारांना काम देण्यात आले. त्यातून ठेकेदारांनी फक्त आपला लाभ बघितला आहे. कोणताही ठेकेदार हा आपल्या कंपनीचा फायदा पाहत असतो. त्यातूनच भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्र राज्याला पाणीदार बनवायचे असेल, ऋतूचक्राप्रमाणे पिकांचे आयोजन केले पाहिजे. पाण्याची योजना ही विकेंद्रित झाली पाहिजे. या सर्वांना भ्रष्टाचारापासून लांब ठेवल्याचे प्रतिपादनही राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
हेही वाचा - भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेक नगरसेवक उत्सुक - अजित पवार