ETV Bharat / state

सोलापूर पोलिसांचा दणका! विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, 500 वाहने घेतली ताब्यात

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:57 AM IST

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वांनी घरीच राहण्याच्या सूचना सर्वत्र दिल्या जात आहेत. मात्र लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणांऱ्या विरोधात सोलापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

Solapur police seize 500 bikes
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांच्या 500 गाड्या पोलिसांनी घेतल्या ताब्यात

सोलापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वांनी घरीच राहण्याच्या सूचना सर्वत्र दिल्या जात आहेत. मात्र लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणांऱ्या विरोधात सोलापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. सोलापूरात पोलिसांनी आज (रविवार) सकाळपासून जवळपास 500 दूचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.

हेही वाचा... 'नऊ मिनिटे लाईट बंद केल्यास महावितरण कंपनीचे नुकसान, विद्युत दाब येणार ही अफवा'

काल (शनिवार) सोलापूरकरांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी सकाळपासूनच कडक कारवाईला सुरूवात केली आहे. शनिवारी बॅंकाच्या समोरही मोठी गर्दी झाली होती. जीवनावश्यक गोष्टींचे कारण पुढे करत अनेकजण रस्त्यावर फिरत असताना पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच कारवाईला सुरूवात केली आहे. सकाळी मार्निग वॉकला जाणारे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी 500 पेक्षा अधिक गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.