ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यात कोरोना धोका वाढला, प्रशासनाकडून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू - corona in solapur district

कोरोना संसर्गाचे प्रमाण पंढरपूर तालुक्यात आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जात आहे. तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करून 21 गावांमध्ये 14 दिवसांच्या संचारबंदी करण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यात कोरोना धोका वाढला, चाचण्या वाढवल्या

author img

By

Published : Aug 26, 2021, 6:42 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - पंढरपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जात आहे. पंढरपूर तालुक्यात तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करून 21 गावांमध्ये 14 दिवसांच्या संचारबंदी करण्यात आली आहे. तरी, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी नागरिकांना केले आहे.

पंढरपूर तालुक्यात कोरोना धोका वाढला, प्रशासनाकडून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू

पंढरपूर तालुक्यात संचारबंदी व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाचा तिसरा लाटेचा संभाव्य धोका ओळखून पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा तालुक्‍यात दहा दिवसाची संचारबंदी लागू केली होती. मात्र, ही संचारबंदी कोरोनाची लाट रोखण्यात अपयशी ठरली आहे. दहा दिवसांच्या लॉकडाउनच्या नंतर पाचही तालुक्यांमध्ये करण्याची परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले होते. सध्याच्या ऐन सणासुदीच्या दिवसांत व्यापारी वर्गाकडून अशा संचारबंदीला तीव्र विरोध होत आहे. दहा दिवसांपूर्वी लावलेली संचारबंदी ही 21 गावांसाठी लावावी अशी मागणीही पंढरपूर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून त्याबाबत कोणताही विचार केला गेला नाही. त्यानंतर आज 21 गावांमध्ये 14 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.

ग्रामीण भागात नो टेस्ट नो रेशन मोहीम जोरात सुरुवत

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या गावातील मुख्य रस्ते हे वाहतुकीसाठी खुले राहणार आहेत. मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी 'नो टेस्ट नो रेशन' ही संकल्पना राबवण्यात आली आहे. तावशीसह अनेक गावांमध्ये रेशन घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतरच त्या ग्रामस्थांना रेशन देण्यात आल्याची माहितीही तहसीलदार बेल्हेकर यांनी यावेळी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.