ETV Bharat / state

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची भाजप सरकारविरोधात निदर्शने - Solapur city district congress committee news

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर ईंधन दरवाढ विरोधात निदर्शने करुन पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. तसेच दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती कोविंद यांना पाठविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची बीजेपी सरकार विरोधात निदर्शने

author img

By

Published : Jun 29, 2020, 3:03 PM IST

सोलापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश गंभीर संकटाचा सामना करत असताना बीजेपी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करुन नफेखोरी करत आहे. याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर ईंधन दरवाढ विरोधात निदर्शने करुन पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. तसेच दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती कोविंद यांना पाठविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, मोदी सरकार करत असलेल्या दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.०१ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७-८८ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीमध्ये तर डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. यामुळे वाहतूक व उत्पादन खर्च वाढून महागाई वाढणार आहे. ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल १०० रुपये लिटर होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत.

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची बीजेपी सरकार विरोधात निदर्शने
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची बीजेपी सरकार विरोधात निदर्शने

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही. कोरोनाच्या महामारीने जनता त्रस्त आहे. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती १६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या असतानाही त्याचा बोजा सामान्यांवर पडणार नाही, याची काळजी घेत इंधनाचे दर स्थिर ठेवले होते.

२०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. केंद्रातील भाजप सरकारने हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये तर डिझेल ३१.८३ रुपये पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे मोदी सरकारने दररोज इंधन दरवाढ करुन जी लूट सुरु केली आहे, ती बंद करावी. तसेच भाववाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प. म. यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश सूरते, अशोक कलशेट्टी, अरुण साठे, नागनाथ कदम, आझम सैफन, नुरुद्दीन मुल्ला, आदि उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.