सोलापूर- आज फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी हरियाणामधील तसेच इतर फलटण मधील कंपनीत काम करणारे काही कार्यकर्ते भाजपाचे रुमाल, टोप्या आणि झेंडे घेऊन आलेले पाहायला मिळाले. प्रचारसभेतील इतर मुद्द्यांपेक्षा हाच जास्त चर्चेचा विषय ठरला.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेनेचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फलटण येथे सभा आयोजित करण्यात आले आहे. या सभेला बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमधून वेगळा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे. अनेक खाजगी कंपन्या मधील कामगार या सभेला बोलवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गर्दी नक्की कोणाची? असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. दरम्यान, बड्या नेत्यांच्या प्रचारसभांना गर्दी दिसावी यासाठी सर्रास भाडेत्वावर कामगारांना आणले जात असल्याचा प्रकार याआधीही अनेक ठिकाणी उघडीकस आलेला आहे. आज उघडकीस आलेला हा प्रकारही गंभीर असाच म्हटला जाईल.