ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणूक : जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी - Government Grain Warehouse vote Counting Pandharpur

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे आज सकाळी 8.00 वाजतापासून सुरू होणार आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केली.

Counting Center Collector Shambharkar inspection Pandharpur
मतमोजणी केंद्र जिल्हाधिकारी शंभरकर पाहणी पंढरपूर
author img

By

Published : May 2, 2021, 2:30 AM IST

सोलापूर - पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे आज सकाळी 8.00 वाजतापासून सुरू होणार आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केली.

सूचनांचे काटेकोर पालन करा - शंभरकर

मतमोजणीबाबत, तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी कक्षात संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी करून घ्यावी. कक्षातील विदयुत जोडणीमध्ये कुठेही शॅर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अग्निशमन दल, वैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे, तसेच पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

हेही वाचा - सोलापुरात शनिवारी 2 हजार 233 जणांना कोरोनाची लागण

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मतमोजणी टेबल, आरोग्य कक्ष, पीपीई किट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष यांची पाहणी करून आवश्यक सूचनाही दिल्या. मतमोजणी टेबलवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड, पीपीई किट, उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. तसेच, मतदान कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.

हेही वाचा - करकंबमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.