पंढरपूर (सोलापूर) - राज्यातील सहकारी संस्थेच्या निवडणुकांमध्ये सारखे बदल होत नाही. कोरोना महामारीमुळे निवडणुका होऊ शकल्या नाही. या निवडणुका जुन्या नियमानुसार होईल, त्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल,अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंगळवेढा येथे दिली. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसंवाद यात्रेचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
कागदपत्रे तपासून कारवाई होईल -
मंगळवेढा तालुक्यातील दामाजी साखर कारखान्यातील 19 हजार सभासदांना क्रियाशील व आणि अक्रियाशील, अशा नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. याबाबत भगीरथ भालके यांना माहिती दिली आहे. या संदर्भात चौकशी नंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी दिले. तसेच ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवून कर्ज घेतले असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. यात साखर कारखान्याबरोबर बँकांचाही दोष आहे. कर्ज प्रकरणात बँक शेतकरी आल्याशिवाय कर्ज देत नाही. मात्र, तरी कर्ज घेतलेल्या त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिली आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.
साखरेचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट -
राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाळपबाबतीत दरदिवशी आकडे वाढत आहेत. साखर उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेचे प्रमाण अधिक होताना दिसत आहे. एमएसबी वाढवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.
उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेणार -
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवारीबाबत समाजाच्या दृष्टिकोनातून व जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही प्रकारचे उमेदवार बाहेरील पक्षात नसतील. याबाबत सर्व निर्णय पक्षातील नेते घेतील, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा - पुणे - पुलवामा हल्ल्यातील हुतात्मांना 'सद्धभावना सायकल रॅली'द्वारे श्रद्धांजली