ETV Bharat / state

Mothers Day Special : आईच्या पाठिंब्याने जगातील पर्वतांना सर करणारा गिर्यारोहक

2015 साली आनंद बनसोडे याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. पण आनंद बनसोडेच्या आईने वडिलांची जागा घेत आपल्या लेकरांना धीर दिला. आणि या आयुष्यात आणखीन यश कसे मिळवायचे याचे धडे दिले. आईने खंबीर साथ दिल्याने आनंद बनसोडे याने न्यूयॉर्कमध्ये आपले कार्यालय उघडले. आणि त्या ठिकाणी एका कंपनी सोबत व्यवसायात उंच भरारी घेतली आहे.

Mothers Day Special
Mothers Day Special
author img

By

Published : May 8, 2022, 7:25 AM IST

सोलापूर - जगातील सर्वोच शिखर पार करत जागतिक रिकोर्ड करणाऱ्या आनंद बनसोडेला आईने मोलाची साथ दिली. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना सुद्धा आनंदला काहीही कमी पडू दिले नाही. 2012 मध्ये आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे आनंद बनसोडे याने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. माऊंट एव्हरेस्ट सह चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम आनंदने करून दाखवले आहे. पण हवं सर्व घडले आईने दिलेल्या पाठिंब्याने असे आनंद मदर्स डेच्या दिवशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.

आईच्या पाठिंब्याने जगातील पर्वतांना सर करणारा गिर्यारोहक

विक्रमांचा बादशाह आनंद बनसोडे - 2012 मध्ये एव्हरेस्ट सर केले. यानंतर वर्ल्ड पीस सेवन समिट मोहीम काढून 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर केली. प्रत्येक शिखरावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून लिम्का बुक बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रिकोर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम केले. एव्हरेस्ट सर करताना आलेल्या अडचणीना आनंदने आईने दिलेल्या हिमतीमुळे मात करत मिळवलेले यश अनेक ठिकाणी अधोरेखित केले आहे.

वडिलांचे छत्र हरपले पण आईने बळ दिले - 2015 साली आनंद बनसोडे याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. पण आनंद बनसोडेच्या आईने वडिलांची जागा घेत आपल्या लेकरांना धीर दिला. आणि या आयुष्यात आणखीन यश कसे मिळवायचे याचे धडे दिले. आईने खंबीर साथ दिल्याने आनंद बनसोडे याने न्यूयॉर्कमध्ये आपले कार्यालय उघडले. आणि त्या ठिकाणी एका कंपनी सोबत व्यवसायात उंच भरारी घेतली आहे.

मदर्स डे बाबत - मदर्स डेचा इतिहास ग्रीस या देशाशी संबंधित आहे. याला युनान असेही म्हणतात. असे सांगितले जाते की, त्या वेळी ग्रीक देवतांच्या आईचा केवळ आदर केला जात नव्हे तर त्यांची पूजा देखील केली जात होती. पण याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. जगात पहिल्यांदा मदर्स डे कधी साजरा याचा अभ्यास केला तर 1908 च्या सुमारास मदर्स डे साजरा करण्याची कल्पना सुचली. परंतु 1914 च्या सुमारास हा दिवस साजरा करण्याची घोषणा झाली. तेव्हा पासून दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.