ETV Bharat / state

माढ्यामध्ये निवडणुकीला गालबोट, दोन गटात हाणामारी - माढा विधानसभा इलेक्शन न्यूज 2019

अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान प्रकिया थांबविली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

माढ्यामध्ये दोन गटात हाणामारी
author img

By

Published : Oct 21, 2019, 12:07 PM IST

Updated : Oct 21, 2019, 1:43 PM IST

सोलापूर - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, माढा तालुक्यातील दहिवली गावात 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याची माहिती आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ मतदान प्रकिया थांबविली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

माढ्यामध्ये दोन गटात हाणामारी

संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रकिया थांबविली होती. मात्र, प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू झाली.

दहिवली हे गाव माढा तालुक्यात असले तरी ते करमाळा विधानसभा मतदारसंघात येते. शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तसेच संजय शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

Intro:mh_sol_03_karmala_rada_7201168

माढा तालुक्यातील दहिवली गावात दोन गटात हाणामारी, काही काळ मतदान प्रक्रिया बंद, मतदान पूर्ववत सुरू

सोलापूर-

माढा तालुक्यातील दहिवली येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना आहे.
अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली आहे. संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या मारहाणी नंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रकिया थांबविली होती. संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रकिया थांबविली होती. पण प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे मतदान सुरू झाले आहे.Body:दहिवली हे गाव माढा तालुक्यात असले तरी ते करमाळा विधानसभा मतदार संघात आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी नाकारल्या मुळे ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. तसेच संजय शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढवीत आहेत..
Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.