सोलापूर (करमाळा) - पवित्र रमजान महिना मुस्लिम समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या कलावधीत उपवास करणे, एकत्र येऊन नमाज पठण करणे, अन्न दान करणे हे पवित्र मानले जाते. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी रमजानची नमाज मशिदीत न येता घरूनच अदा करण्याचे आवाहन शहराचे मुख्य काझी मुजाहीत काझी यांनी केले आहे.
करमाळ्यात याच पद्धतीने दरवर्षी रमजान महीना पाळला जातो. मात्र, या वर्षी कोरोनाचा वाढता धोका व प्रशासनाने केलेल्या अवाहनास प्रतिसाद देऊन पारंपारिक पध्दीने रमजान साजरा न करता घरातून साजरा करण्याचे अवाहन मुजाहीत काझी यांनी केले आहे.
ते म्हणाले डॉक्टर,पोलीस, प्रशासकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करत आहेत. म्हणून आपण आपली ही जबाबदारी ओळखून लाँकडाऊन यशस्वी होण्यासाठी कटीबध्द राहीले पाहीजे. आपल्या एकाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे पुर्ण मुस्लिम समाज बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी. गोरगरीब लोकांना शक्य तेवढी मदत करण्याची विनंतीही त्यांनी समाजबांधवांना केली.