ETV Bharat / state

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अक्कलकोट दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल
author img

By

Published : Oct 19, 2020, 10:35 AM IST

Updated : Oct 19, 2020, 6:52 PM IST

15:38 October 19

उद्धव ठाकरेंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी; मात्र आश्वासनाशिवाय कोणतीच घोषणा नाही

सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी काठच्या नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. तसेच काही पूरग्रस्त  नागरिकांना तातडीची मदत म्हणून धनादेशाचेही वाटप करण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. ते शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील.. कोणीही खचून जाऊ नका असे आवाहन केले. मात्र ठाकरे यांनी यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही ठोस मदतीची घोषणा केली नाही, त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिलेल्या आणि अतिवृष्टीने नुकसान होऊन खचलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याच नाहीत.

15:38 October 19

केवळ काहीतरी घोषणा करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे. अजून परतीचा पाउस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही. धोक्याचा इशारा आहे मात्र  पंचनामे सुरु झाले असून ते परब झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल

15:37 October 19

जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही मात्र सध्या संकट संपलेले नाही. प्राणहानी  होऊ देऊ नका अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत  

15:36 October 19

पावसाची ही परिस्थिती आत्ताच , आजच कळली असे नाही. आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते.  

15:36 October 19

उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.

15:35 October 19

यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले, पूर्व विदर्भात पूर आला, त्यावेळीही  मदत केली आहे . उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे.

14:55 October 19

शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही.

14:54 October 19

उद्धव ठाकरे यांची सोलापूर नुकसान पाहणी दौऱ्यानंतर पत्रकार परिषद

धोक्याचा इशारा, अतिवृष्टी होऊ शकते, त्यामुळे संकटाचा काळ सरल्याशिवाय घाईने निर्णय घेणे योग्य नाही

14:54 October 19

पंतप्रधान मदतीसाठी सकारात्मक आम्ही मदत केल्या शिवाय राहणार नाही,

14:54 October 19

७२ वर्षात असा पाऊस पाहिला नसल्याच्या शेतकऱ्यांनी सांगितले , हेभयंकर आहे

14:54 October 19

हवामान विभागाचा इशारा असताना देखील प्रशासनाने उजनीतून पाणी सोडले नाही, माहिती घेऊन त्याची चौकशी करणार

14:53 October 19

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्यांनी काही बोलण्याआधी त्यांचे दुख ओळखून त्यांना मदत कऱण्याची गरज आम्ही ते करणार

14:53 October 19

२ ते ३ दिवस थांबून धोका टळल्यानंतर मदतीचा निर्णय जाहीर करण्याचे सूचक वक्तव्य

14:53 October 19

राज्यांची आणि देशाची काळजी घेणे हे केंद्राचे कर्तव्य आहे, आणि पंतप्रधानांनी ते केले आहे

14:53 October 19

या अतिवृष्टीत राजकारण करू नका, बिहारमध्ये राजकारण करणाऱ्यांनी राज्यात एकत्र येऊन मदत करण्यासाठी सहकार्य करावे

14:53 October 19

आणखी काही दिवस अतिवृष्टीचा इशारा, कृपया कोणी गाफील राहून नका, कोणतीही प्राणहाणी होऊ देऊ नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे.

11:44 October 19

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यंमत्री ठाकरेंचा अक्कलकोट दौरा

शेतकऱ्यांना आश्वासन तुम्हाला नाराज करणार नाही, हे तुमचे सरकार तुम्हाला मदत नक्की करणार...  सर्व भागात पंचनामे सुरू आहेत आढावा घेऊन मदत जाहीर करणार...  

11:43 October 19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल

राज्याचे येणे केंद्राकडे बाकी आहे.. म्हणून केंद्राकडे मागणी करण्याची वेळ.. विरोधकांनी आता राजकारण करू नये.. ते ही राज्यकर्ते होते असे ठाकरे यावेळी म्हणाले.

11:43 October 19

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यंमत्री ठाकरेंचा अक्कलकोट दौरा

पूररेषा लक्षात घेूऊन पूनर्वसन करणार, आता ही गाफील राहू नका पावासाचा इशाार आहे.. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी रामपूरमधील ग्रामस्थांशी संवाद साधला

11:42 October 19

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यंमत्री ठाकरेंचा अक्कलकोट दौरा

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाेल आहे. त्यांना मदत करायचीच आहेत.  गरज पडलीतर पंतपंधानांना मदतीसाठी विनंती करणार

11:41 October 19

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यंमत्री ठाकरेंचा अक्कलकोट दौरा

हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, त्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी जे काही चांगले करता येईल ते नक्कीच करणार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.

11:41 October 19

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, संपूर्ण आपत्तीग्रस्त भागाचे दौरे करणार. पुढील दौऱ्याची लवकरच माहिती दिली जाईल

11:40 October 19

पुरामुळे प्राणहानी होणार नाही, याची काळजी घेणार, केंद्र आणि राज्य असा दुजाभाव करणे योग्य नाही  

11:40 October 19

आम्ही फक्त अभ्यास करत बसणार नाही तर त्यावर तातडीने निर्णय घेणार ,फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा टोला  

11:13 October 19

अक्कलकोट दौरा

उद्धव ठाकरेंनी केली हत्ती तलावाची पाहणी,  अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळात दाखल, राजे जन्मेजय भोसले आणि मंदिर संस्थानाकडून ठाकरेंचे स्वागत

11:06 October 19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द येथे भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द येथे भेट दिली. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावात बोरी नदीच्या पुराने मोठे नुकसान केले होते.

उद्धव ठाकरे यांचे हस्ते पूरग्रस्तांना तत्काळ मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

11:03 October 19

या कठीण काळात महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसोबत - महसूलमंत्री थोरात

राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता सर्वच नेते बाहेर पडले आहेत. आज मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही अक्कलकोटमध्ये नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यावेळी महाविकास आघाडी सरकार या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यासोबत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

10:44 October 19

उद्धव ठाकरे कडून नुकसानीची पाहणी सुरू, शेतकऱ्यांशी साधला संवाद.. सांगवी गावातील नुकसानीची तेथील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून जाणून घेतली माहिती,शेतकऱ्यांची घेतली निवदने

10:43 October 19

शेतकऱ्यांची घेतली निवदने
शेतकऱ्यांची घेतली निवदने

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील बोरी नदीच्या पुलावर दाखल, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जय सिद्धेश्वर , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मिलिंद नार्वेकर या ठिकाणी उपस्थित

10:40 October 19

ठाकरे अक्कलकोटमध्ये दाखल, खासदार जयसिद्धेश्वर यांनी केले स्वागत

उद्धव ठाकरे अक्कलकोट तालुक्यात दाखल, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची घेतल्या भेटी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे दिले आश्वासन

10:24 October 19

उद्धव ठाकरे अक्कलकोटमध्ये
उद्धव ठाकरे अक्कलकोटमध्ये

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पाहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. अक्कलकोट येथील सांगवी खुर्द,रामपूर,आणि बोरी उमरगे व अक्कलकोट शहर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

Last Updated : Oct 19, 2020, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.