ETV Bharat / state

बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे

यावेळी शासकीय पुजेचा मान मानाचे वारकरी म्हणून श्री सुनील महादेव ओमासे (वय 42 ) पत्नीचे नाव नंदा सुनिल ओमासे (वय 35) यांना मिळाला. ते 2003 पासून सलग पंढरपूरची वारी करत असून व्यवसायाने ते शेतकरी आहेत.

कार्तिकनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न;
author img

By

Published : Nov 8, 2019, 8:02 AM IST

Updated : Nov 8, 2019, 10:47 AM IST

पंढरपूर - राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव;

यावेळी बोलताना पाटील यांनी, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे’.गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला.वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले.पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान कार्तिक वारीच्या पूर्वसंध्येला चंद्रकांत पाटील पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बा विठ्ठ्ला आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर अशी विनवणी विठ्ठलाकडे करणार असल्याचे ते म्हणाले होते.

वारकरी संप्रदायात सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार वाऱ्यांपैकी एक मुख्य वारी म्हणून कार्तिकी वारी मानली जाते. या वारीला दक्षिणेतील भाविक पंढरीत येतात व रुक्मिणीचे दर्शन घेतात. आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.यावेळी शासकीय पुजेचा मान मानाचे वारकरी म्हणून श्री सुनील महादेव ओमासे (वय 42 ) पत्नीचे नाव नंदा सुनिल ओमासे (वय 35) मु.पो.मल्लेवाडी.बेडग ता.मिरज यांना मिळाला. ते 2003 पासून सलग पंढरपूरची वारी करत असून व्यवसायाने ते शेतकरी आहेत.आज पहाटे श्री विठ्ठलच्या शासकीय पूजेस प्रारंभ झाला. यावेळी, सरकार स्थापनेस आज किंवा उद्या यश मिळेल, अशी भावना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केली. तसेच येणारी आषाढी वारी ही धुरमुक्त वारी करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. या ठिकाणी मोफत गॅस सिलेंडर तसेच शेगडी मिळेल अशी व्यवस्था शासन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ऋतूचक्र बदलले आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. शेतात पिक नीट पिकले नाही तसेच भाव मिळाला नाही की समस्या निर्माण होतात, असेही पाटील म्हणाले.यावेळी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेश धोकटे यांनी केले.कार्तिकी जनावरांचा बाजार फुलला-समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी जनावरांचा बाजार फुलला आहे. येथील बाजारात सुमारे चार हजारांहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून व्यापारी व शेतकरी आले. आज पहिल्याच दिवशी येथील बाजारात सुमारे 20 लाखांहून अधिक उलाढाल झाली असल्याची माहिती आहे.

Intro:Body:

कार्तिकनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न; सांगलीच्या ओमासे दाम्पत्याला मिळाला मान

पंढरपूर - कार्तिकी वारीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी शासकीय सांगलीचे वारकरी दाम्पत्य  सुनिल आणि नंदा ओमासे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. दरम्यान कार्तिक वारीच्या पूर्वसंध्येला चंद्रकांत पाटील पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बा विठ्ठ्ला आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर अशी विनवणी विठ्ठलाला घालणार असल्याचे ते म्हणाले होते.

वारकरी संप्रदायात सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार वाऱ्यांपैकी एक मुख्य वारी म्हणून कार्तिकी वारी मानली जाते. या वारीला दक्षिणेतील भाविक पंढरीत येतात व रुक्मिणीचे दर्शन घेतात. आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

मानाचा वारकरी नांव आहे श्री सुनील महादेव ओमासे वय 42 पत्नीचे नाव नंदा सुनिल ओमासे (वय 35) मु.पो.मल्लेवाडी.बेडग ता.मिरज जिल्हा. ते 2003 पासून सलग पंढरपूरची वारी करत असून व्यवसायाने ते शेतकरी आहेत. 

आज पहाटे श्री विठ्ठलच्या शासकीय पूजेस प्रारंभ झाला. यावेळी, सरकार स्थापनेस आज किंवा उद्या यश मिळेल, अशी भावना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केली. तसेच येणारी आषाढी वारी ही धुरमुक्त वारी करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. या ठिकाणी मोफत गॅस सिलेंडर तसेच शेगडी मिळेल अशी व्यवस्था शासन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ऋतूचक्र बदलले आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. शेतात पिक नीट पिकले नाही तसेच भाव मिळाला नाही की समस्या निर्माण होतात, असेही पाटील म्हणाले.

यावेळी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी, आदी उपस्थित होते.  सुत्रसंचालन राजेश धोकटे यांनी केले.

कार्तिकी जनावरांचा बाजार फुलला-

समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी जनावरांचा बाजार फुलला आहे. येथील बाजारात सुमारे चार हजारांहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून व्यापारी व शेतकरी आले. आज पहिल्याच दिवशी येथील बाजारात सुमारे 20 लाखांहून अधिक उलाढाल झाली असल्याची माहिती आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.