ETV Bharat / state

...तोपर्यंत मनसे, भाजपची युती होऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jan 29, 2021, 10:24 PM IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलावी, जोपर्यंत ते परप्रांतीयांबद्दलची आपली भूमिका बदलत नाही, तोपर्यंत निवडणुकीमध्ये भाजप मनसेची युती होऊ शकत नाही. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते सोलापूरमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

सोलापूर- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलावी, जोपर्यंत ते परप्रांतीयांबद्दलची आपली भूमिका बदलत नाही, तोपर्यंत निवडणुकीमध्ये भाजप मनसेची युती होऊ शकत नाही. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते सोलापूरमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी नवे कृषी कायदे, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, धनंजय मुंडे, मराठा आरक्षण अशा सर्वच विषयांवर प्रतिक्रिया दिली.

भाजप व मनसे एकत्र येणे शक्य नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलणे गरजेचे आहे. 80 टक्के मराठी माणसांना नोकरी देण्याचा कायदा आहे. मग रिक्षा व टॅक्सीवाल्या बिहारींना राज ठाकरे अटकाव का करतात. त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र जोपर्यंत राज ठाकरे आपली परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत मनसेसोबत युती होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

राज्यातील शेतकरी कृषी कायद्यांबद्दल समाधानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकरी या कायद्यांबद्दल समाधानी आहे. मग हा हिसांचार कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान दिल्लीमध्ये आंदोलनात हिंसाचार झाला, तो अतिशय दुर्दैवी आहे. या शेतकऱ्यांसोबत 12 वेळेस चर्चा झाली, मात्र तोडगा निघत नाही. यामागे विरोधक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील आमचे नेते जे करत आहेत ते चुकीचे

कर्नाटक मधील आमचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत,असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.