पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या चौघांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई तीन ब्रास वाळू व जेसीबी, असा 18 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पांडुरंग बाळासाहेब कराळे (वय 27 वर्षे), शेतमालक सागर बाबुराव माने, जेसीबी मालक सुनील भोसले, जीवन दत्तात्रय भोसले (रा. सरकोली, ता. पंढरपूर) यांच्यावर गौण खनिजाची चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
याबाबत पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा नदी पात्राजवळील सागर माने यांच्या शेतामधून वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सरकोली येथे छापा टाकला. यावेळी जेसीबीच्या सहायाने वाळू उपसा करण्यात येत होता. पोलिसांना पाहताच वाळूमाफियांनी पळ काढला. या कारवाईत जेसीबीसह तीन ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - आगामी विठ्ठल कारखाना निवडणुकीत स्वतंत्र पॅनल - युवराज पाटील