ETV Bharat / state

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी साधला दसऱ्याचा शुभमुहूर्त - mangalweda election news

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक ही चौरंगी होत असून आमदार भारत भालके हे हॅट्रीक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारीला लागले आहेत. जिल्हा दूध संघ, युटोपियन व पांडुरंग परिवार तसेच अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला कामं दिले आहेत. त्यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवला आहे.

मंगळवेढा
author img

By

Published : Oct 9, 2019, 12:19 PM IST

सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. आमदारकीरसाठी नवरात्र महोत्सवातही जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवण्यासाठी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते मतदारांच्या संपर्काची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक ही चौरंगी होत असून आमदार भारत भालके हे हॅट्रीक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारीला लागले आहेत. जिल्हा दूध संघ, युटोपियन व पांडुरंग परिवार तसेच अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला कामं दिले आहेत. त्यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवला आहे.

दुसरीकडे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी कारखाना निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यातील कमी दराने साखर देण्याच्या आश्‍वासनाची पूर्ती करत आहेत. त्यांनी सभासदांना १० रुपये किलोने साखर वाटप केली आहे. तर सूतगिरणीच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी काम दिले.

काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी पक्षाचा अधिकृत अर्ज ठेवत आमदार भारत भालके यांना चांगलाच धक्का दिला आहे. त्यांच्या या खेळीमुळे आघाडीत बिघाडी झाली आहे. निवडणुकीसाठी स्वबळाची यंत्रणा राबवण्यासाठी अवताडे, परिचारक, काळुंगे हे सक्षम आहेत. समाधान अवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या दक्षिण भागात राबता वाढवला आहे. आता नवरात्र महोत्सवातून संपर्कात सातत्य ठेवल्याने शहर व ग्रामीण भागातील देवीच्या पूजा करत विजयाचे साकडे घातले आहे.

हेही वाचा - ३७० कलमाच्या माध्यमातून लोकांच्या भावनेला हात घालण्याचे काम; शरद पवारांची भाजपवर टीका

चारही उमेदवारांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा मतदाराला थेट एसएमएस व व्हा्ॅटसअॅपवर देत संपर्क वाढवला असून येत्या २४ तारखेला विधानसभा निवडणुकीत देवीचा आशीर्वाद घेण्यात कोणता उमेदवार यशस्वी ठरतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Intro:मंगळवेढा तालुक्यातील विधानसभा निवडणूकीत चांगलीच रंगत येत असून आमदारकीरसाठी नवरात्र महोत्सवातही जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवण्यासाठी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील संभाव्य इच्छुक उमेदवार सातत्याने प्रयत्नशील असून संपर्काची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र समोर आले आहे.Body:मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक ही चौरंगी होत असून आ.भारत भालके हे हट्रीक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे मागील निवडणूकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारी केली आहे.जिल्हा दुध संघ,युटोपियन व पांडुरंग परीवार,तसेच अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिले आहे.त्यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवला आहे.

दुसरीकडे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.ते कारखाना निवडणूकीत दिलेल्या वचननाम्यातील कमी दराने साखर देण्याच्या आश्‍वासनाची पुर्ती करून सभासदांना १० रुपये किलो ने साखर वाटप केले. सूतगिरणीच्या माध्यमातून अनेक महिलांना काम दिले.

काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी पक्षाचा अधिकृत अर्ज ठेवत आमदार भारत भालके यांना चांगलाच धक्का दिला आहे.त्यांच्या या खेळीमुळे आघाडीत बिघाडी झाली आहे.

निवडणुकीसाठी स्वबळाची यंत्रणा राबवण्यासाठी आवताडे,परिचारक,काळुंगे हे सक्षम आहेत.समाधान आवताडे यांनी मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या दक्षिण भागात राबता वाढविला आहे.आता नवरात्र महोत्सवातून संपर्कात सातत्य ठेवल्याने शहर व ग्रामीण भागातील देवीच्या पुजा करत विजयाचे साकडे घातले.

चारही उमेदवारांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा मतदाराला थेट एस.एम.एस व व्हाटसअपवर देत संपर्क वाढविला असून येत्या २४ तारखेला विधानसभा निवडणूकीत देवीचा आशिर्वाद घेण्यात कोणता उमेदवार यशस्वी ठरतो याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.