सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालूक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य हे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माळढोक अभयारण्यातील पर्यटन केंद्र, विश्रामगृहांसह, निसर्ग पर्यटन सुविधा ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - CORONA : कोरोनामुळे पंढरपूरचे विठ्ठल-रुख्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माळढोक अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या सोबतच सोलापूर शहरातील प्राणी संग्राहलय आणि 32 उद्यानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्रीय प्राणी संग्राहलय प्राधिकरण व महाराष्ट्र प्राणी संग्रहालय यांनी गर्दी टाळण्यासाठी प्राणी संग्राहलय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयात येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच उद्यानातील होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी 31 मार्चपर्यंत प्राणी संग्रहालय तसेच उद्यानात येऊ नये, असे आवाहन प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांनी केले आहे.
हेही वाचा - Coronavirus : कोरोना व्हायरसचे पडसाद, सिद्धेश्वर मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद