सोलापूर - मोहोळ पोलीस ठाण्यात लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे याला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत होते.
तीन वर्षांपूर्वी साळोखे हे मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना त्यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्याशी झालेल्या वादामुळे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे चर्चेत आले होते.