पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने या मतदारसंघाचा आम्ही विकास करू, तालुक्यातील जनता भाजपला चांगल्या मतांनी विजयी करेल, असा विश्वास पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एबी फॉर्म देण्यात आला.
हेही वाचा - बाळ बोठेला पुन्हा पोलीस कोठडी, सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी
महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचे स्वप्न भंग
महाविकास आघाडी सरकारने राज्याचे पूर्णपणे स्वप्न भंग केले आहे. राज्यातील हे सरकार अनैसर्गिक पद्धतीने झालेले सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्य हे रसातळाला नेण्याचे काम केले. कोरोनाकाळात ज्या पद्धतीने राज्याचं नियोजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. त्या वेळेस माझं कुटुंब माझी जबाबदारी त्याप्रमाणे त्याचे नेतृत्व घरामध्ये बसून आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते त्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेत होते. पण सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत केली नाही, अशी टीका माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पंढरपूर मंगळवेढा तालुका गेल्या दहा वर्षापासून विकासापासून वंचित
आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदेसाठी करोडो रुपयांचा निधी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा कोणताही विकास झालेला नाही. यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनता विकासापासून वंचित आहे. यामुळेच आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठिंब्याने समाधान आवताडे यांच्या विजयाची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन बाळा भेगडे यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित अर्ज भरणार
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची 30 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. भाजपकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी भरताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा - संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया