करमाळा (सोलापूर) - तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. तसेच खोटे गुन्हे देखील दाखल केले जातात. असा आरोप करमाळा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप आणि समविचारी संघटनांकडून आजपासून तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध-धंदे सुरू आहेत. पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जी व्यक्ती गुन्ह्याची माहिती देते, त्यावरच खोटा गुन्हा दाखल केला जातो, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपने शुक्रवारपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे या आंदोलकांनी सांगितले. याबाबत आंदोलकांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा - सोलापुरात मटक्याचा अड्डा उध्वस्त; गुन्हे शाखेची कारवाई
हेही वाचा - पंढरपुरात तणाव! संचारबंदी लागू, शहराकडे येणारे रस्ते बंद, मराठा समाज मात्र आक्रोश मोर्चावर ठाम