पंढरपूर (सोलापूर) - राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत त्यामुळे भगीरथ भालके यांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्याला उत्तर देताना भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, कोरोनामुळे राज्याच्या जनतेला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत. जनतेला द्यायला त्यांच्याकडे कोणतेही पॅकेज नाही. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये तिजोरीचे चाव्याचे आमिष दाखवत असल्याचा आरोप केला.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माढा खासदार रणजितसिंह निंबाळकर नाईक यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते.
संजय राऊत हे कोरोनाबाबत राजकारण करत आहेत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांना सांगतात की कोरोना विषाणूचा मुद्द्यांवरून राजकारण करू नका. मात्र, खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या माध्यमातून आपली मुखपट्टी काढून राजकारण सुरू केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
राज्य सरकारचा निधी फक्त बारामतीसाठी
दिवंगत आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांसाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. मात्र, 35 गावाच्या पाणीप्रश्नसाठी महाविकास आघाडी एक रुपयाचा निधी दिला नाही. भारत भालके यांनी योजनेसाठी पैसे द्यावी, म्हणून मागणी केली होती. मात्र, मंगळवेढ्यातील 35 गावांचा पेक्षा बारामतीतील पाणीप्रश्नासाठी पैसे दिल्याचा, आरोप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले.
हेही वाचा - 'लसीकरण केंद्रे बंद असताना लस महोत्सव साजरा करता?'