ETV Bharat / state

सोलापुरात जय सिध्देश्वर भाजपचे उमेदवार; लिंगायत मतांसाठी उमेदवारी दिल्याची चर्चा - lingayat

सोलापूर मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामींचा मोठा भक्त परिवार आहेत. मतदारसंघात लिंगायत समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपने जय सिद्धेश्वर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:41 AM IST

Updated : Mar 23, 2019, 11:47 AM IST

सोलापूर - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी निवडणूक लढणार आहेत. जय सिद्धेश्वर हे लिंगायत समाजाच्या मठाचे मठाधीश आहेत. सोलापूर हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. सिद्धेश्वर यांच्याकडे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र असल्याने ते येथून निवडणुकीस पात्र ठरले आहेत.

डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांचा लिंगायत समाजावर मोठा प्रभाव आहे

सोलापूर मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामींचा मोठा भक्त परिवार आहेत. मतदारसंघात लिंगायत समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपने जय सिद्धेश्वर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. सिद्धेश्वर यांच्या उमेदवारीमुळे सुशिलकुमार शिंदेंना आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापूर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाही केली आहे. पण, माढ्याचा उमेदवार कोण असेल याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसापूर्वी रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथील उमेदवारी रणजीतसिंह यांनाच मिळते की भाजप दुसरा पर्याय शोधतो हे पाहणे महत्वाचे आहे.

Intro:R_MH_SOL_01_23_BJP_CANDIDATE_SWAMI_S_PAWAR_VIS
सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून डॉ जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी
सोलापूर-
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असून जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्याकडे बेडा जंगम या जातीचे प्रमाणपत्र असल्यामुळे महाराजांची उमेदवारी अंतिम करण्यात आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामीजी यांचा भक्त परिवार मोठा आहे तसेच या मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाच्या मठांचे वर्चस्व असल्यामुळे भाजपकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Body:सोलापूरची उमेदवारी जाहीर झाली असली तरीही भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही भाजपने माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती मात्र संजय शिंदे यांनी भाजपची उमेदवारी नाकारत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन आज ते प्रचाराचा नारळ फोडणार आहेत संजय शिंदे यांनी सुरुवातीला नाही नाही म्हणत शेवटी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली त्यामुळे ऐनवेळी भाजपला नवीन आणि संजय शिंदे यांना आव्हान देऊ शकणारा उमेदवार शोधणे अवघड होऊन बसले आहे त्यामुळेच म्हणा लोकसभेसाठीची उमेदवारी भाजपकडून अद्यापही जाहीर झालेली नाही.

Conclusion:नोट- डॉ जय सिद्धेश्वर स्वामी यांचे व्हिडीओ सोबत जोडला आहे..
Last Updated : Mar 23, 2019, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.