भाकणूकमध्ये वासराची भविष्यवाणी : वासराने खाल्लेल्या वस्तूंसह लाल व पांढर्या वस्तु महागणार! - Rajasekhara Hirehabbu
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही नागरिक या भाकणुकीच्या बाबींवर विश्वास ठेवतात. यावेळी मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेgहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, सुदेश देशमुख आदी उपस्थित होते.

सोलापूर - स्थिर वातावरणाबरोबर लाल व पांढर्या वस्तू महागणार व मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार, असे भाकीत सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी वर्तवले आहे. दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वर महायात्रेत ( Siddheshwar Mahayatra Solapur ) वासरांकडून भाकणूक केली जाते. फडकुले सभागृह येथे भाकणुकीचा कार्यक्रम ( Bhakanuk program ) झाला. होमप्रदीपन सोहळा झाल्यानंतर वासराची भाकणूक कार्यक्रम संपन्न होतो. सिद्धेश्वर महायात्रेत भाकणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे.
ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेतील तिसऱ्या दिवशी होम मैदानावर मंगलमय वातावरणात कुंभार कन्येला प्रतिकृती अग्नी देण्यात आली. सती गेलेल्या कुंभार कन्येचा पारंपरिक पद्धतीने महापूजा करून हा सोहळा संपन्न झाला. अक्षता सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी बाराव्या शतकात सती गेलेल्या कुंभार कन्येचे मानकरी हिरेहब्बू व देशमुखांच्या वतीने महापूजा व हळद काढण्याचा सोहळा धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पार पडला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही नागरिक या भाकणुकीच्या बाबींवर विश्वास ठेवतात. यावेळी मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, सुदेश देशमुख आदी उपस्थित होते.

वासराने खाल्लेल्या वस्तू महागणार -
भाकणूकच्या ठिकाणी वासरू आणल्यानंतर थोडा घाबरल्यासारखे त्याला वाटले. त्यानंतर तो शांत झाला. त्याला पाणी लावून पूजा करण्यात आली. त्याच्यासमोर तांदूळ, बोर, गाजर, ऊस, पान, खारीक आदी वस्तू ठेवण्यात आले होते. तो सुरुवातीला त्याची पाहणी केल्यानंतर ऊस, गाजर आणि व गुळ खाल्ले. त्यामुळे लाल व पांढरे वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन ते महागणार असल्याचे मानकरी हिरेहब्बू यांनी सांगितले. तसेच यंदाही देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, सामाजिक राजकीय शांतता असेल असेही त्यांनी सांगितले.
समाधानकारक पाऊस पडणार -
वासराने भाकणूकीच्या ठिकाणी मलमूत्र केले. त्यावरून अशी भाकणूक करण्यात आली की, यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडणार. तसेच स्थिर थांबल्याने यंदाच्यावर्षी वातावरण स्थिर राहील असे हिरेहब्बू यांनी भाकणूक केली.
कुंभार कन्येची महापूजा-
सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगा जवळ सती गेलेल्या कुंभार कन्येची महापूजा करण्यात आली. प्रतिकात्मक म्हणून दगडाची पूजा करण्यात आली. कुंभार कन्येला लागणारे संसार पयोगी साहित्य एका मोठ्या टोपली मध्ये ठेवण्यात आले. त्यांनतर त्या टोपलीची पूजा मानकरी सागर हिरेहब्बू व सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ती टोपली शिवशंकर कंतीकर यांनी डोक्यावर ठेवून तलावात सोडले. त्यांनतर सोहळ्याची सांगता झाली.

दुरडीत ठेवलेली वस्तू -
मणी मंगळसूत्र, साडी, कंगवा, आरसा, जोडवे,खणा, कानातील रिंग, असे सुमारे शंभर वस्तू ठेवण्यात आले होते. तसेच कुंभार कन्येला देशमुख यांच्या वतीने पंचपक्वांचा नैवेद्य दाखवला जातो.15 प्रकारच्या भाज्या असतात.
होम प्रदीपन सोहळा -
उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात सायंकाळी साडेपाच वाजता पहिल्या ध्वजाला नागफणा बांधण्यात आला. नागफणा नंदीध्वज आणि दुसऱ्या नंदी ध्वजाची पूजा राजशेखर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते झाली.मानकरी हे पालखीत बसून होम मैदानावर दाखल झाले.होम मैदानावरील होम कुंडात राजशेखर हिरेहब्बू उतरले आणि बाजरीच्या पेंडीचे तयार केलेलं प्रतिकात्मक कुंभार कन्येला सजविण्यात आले. त्यानंतर पूजा करून अग्नी देण्यात आली. जवळपास 150 भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.