ETV Bharat / state

पर्यटन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात हालचाली, पर्यटन मंत्री रावल व कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यात चर्चा

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पर्यटनाविषयी एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यात चर्चा झाली.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, स्मार्ट सिटीचे संचालक प्रा. नरेंद्र काटीकर व अन्य
author img

By

Published : May 8, 2019, 9:25 PM IST

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पर्यटनाविषयी एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यात चर्चा झाली. विद्यापीठात संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या वतीने मदत करण्याची ग्वाही मंत्री रावल यांनी यावेळी दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मंत्री रावल यांना माहिती दिली. मंत्री रावल यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सोलापूर हा धार्मिक पर्यटनाचा जिल्हा म्हणून परिचित आहे. जिल्हातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ, पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी, सोलापूर येथील सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होत असते. याचबरोबर मंगळवेढा येथील ज्वारी, सोलापूरची चादर आणि शेंगा-चटणी, सांगोल्याचा डाळिंबही प्रसिद्ध आहे. वैभवतेने नटलेला हा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पर्यटनासंदर्भात तसेच त्याविषयी माहिती देण्यात येणारा गाईडशिपचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. येणाऱ्या काळात शासनाच्या सहकार्याने विद्यापीठात लवकरच हा अभ्यासक्रम सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक प्रा. नरेंद्र काटीकर हे उपस्थित होते.

Intro:R_MH_SOL_02_08_UNIVERSITY_&_TOURSIM_S_PAWAR
पर्यटन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात हालचाली,
पर्यटन मंत्री रावल व कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यात चर्चा
सोलापूर-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पर्यटनाविषयी एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यात चर्चा झाली. विद्यापीठात संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात शासनाच्यावतीने मदत करण्याची ग्वाही मंत्री रावल यांनी यावेळी दिली.Body:सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मंत्री रावल यांना माहिती दिली. मंत्री रावल यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सोलापूर हा धार्मिक पर्यटनाचा जिल्हा म्हणून परिचित आहे. येथील अक्कलकोट स्वामी समर्थ, पंढरपुरचे पांडुरंग, सोलापूरच्या सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होत असते. याचबरोबर मंगळवेढा येथील ज्वारी, सोलापूरची चादर, सांगोल्याचा डाळिंबही प्रसिद्ध आहे. वैभवतेने नटलेला हा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पर्यटनासंदर्भात तसेच त्याविषयी माहिती देण्यात येणारा गाईडशिपचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. येणाऱ्या काळात शासनाच्या सहकार्याने विद्यापीठात लवकरच हा अभ्यासक्रम सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक प्रा.नरेंद्र काटीकर हे उपस्थित होते.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.