ETV Bharat / state

सिद्धेश्वर यात्रा : लाखो भाविकांच्या साक्षीने 'अक्षता सोहळा' संपन्न - Solapur latest news

या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते. त्यामुळे उद्या (बुधवारी) सोलापुरातील होम मैदानावर होमविधी पार पाडतो.

Siddheshwar Yatra
सिद्धेश्वर यात्रा
author img

By

Published : Jan 14, 2020, 5:14 PM IST

सोलापूर - त्यागाचे प्रतीक असलेला शिवयोगी सिद्धेश्वरांचा आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा संपन्न झाला. या अक्षता सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा आहे. सिद्धेश्वरांची ही यात्रा सर्वधर्म समभावाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने सोलापुरात येतात.

अक्षता सोहळा संपन्न

हेही वाचा - करमाळा युवा सेनेकडून जय भगवान गोयलच्या पुतळ्याचे दहन

लिंगागी अर्थात योग्य असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या कुटीबाहेर एक कुंभाराची कन्या दररोज सकाळी सडा-रांगोळी करत असे. ही गोष्ट सिद्धेश्वर महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कुंभार कन्येला तिची अपेक्षा विचारली असता, तिने सिद्धेश्वरांशी विवाह करू इच्छित असल्याचे सांगितले. तेव्हा सिद्धेश्वरांनी अत्यंत नम्रपणे आपण लिंगागी असल्याने विवाह करू शकत नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही कुंभार कन्येने हट्ट केल्यावर त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याच विवाहाचे प्रतीक म्हणून सोलापुरात हा विवाह सोहळा होतो, अशी आख्यायिका आहे. त्याला अक्षता सोहळा म्हणतात. या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते, असे मानले जाते. त्यामुळे उद्या (बुधवारी) सोलापुरातल्या होम मैदानावर होमविधी पार पाडतो.

हेही वाचा - 'तुमच्या सगळ्यांचा बाप आला'...सोलापूर शिवसेनेत पुन्हा 'फ्लेक्स वॉर'

अशा लौकिक अर्थानं विवाहाची इच्छा, हळदी, विवाह आणि होम म्हणजे प्रेमासाठी सती जाणं ही त्यागाची गोष्ट घडलेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेला सर्व समाज साक्षीदार असल्याने या यात्रेत 7 समाजाच्या मानाच्या 7 काठ्या निघतात. लोक मोठ्या श्रद्धेनं या यात्रेला हजेरी लावतात. आशिया खंडातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होतो. कारण ही यात्रा आजपासून एक महिनाभर चालते.

Intro:सोलापूर : त्यागाचे प्रतीक असलेला शिवयोगी सिद्धेश्वरांचा आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा संपन्न झाला या अक्षता सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा आहे सिद्धेश्वरांची ही यात्रा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानली जाते त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने सोलापुरात येतात.

Body:लिंगागी अर्थात योग्य असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या कुठी बाहेर एक कुंभाराची कन्या दररोज सकाळी सडा-रांगोळी करत असे. ही गोष्ट सिध्येश्वर महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कुंभार कन्येला तिची अपेक्षा विचारली असता.तिने सिद्धेश्वरांशी विवाह करु इच्छित असल्याचे सांगितले.तेंव्हा सिद्धेश्वरांनी अत्यंत नम्रपणे आपण लिंगागी असल्याने विवाह करू शकत नसल्याचे सांगितले. मात्र तरीही कुंभार कन्येनं हट्ट केल्यावर त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याच विवाहाचं प्रतीक म्हणून सोलापुरात हा विवाह सोहळा होतो.त्याला अक्षता सोहळा म्हणतात.या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते.त्यामुळं उद्या सोलापुरातल्या होम मैदानावर होमविधी पार पाडतो.

Conclusion:अशा लौकिक अर्थानं विवाहाची इच्छा... हळदी. विवाह आणि होम म्हणजे प्रेमासाठी सती जाणं ही त्यागाची गोष्ट घडलेली आहे.या घटनेला सर्व समाज साक्षीदार असल्याने आज या यात्रेत सात समाजाच्या मनाच्या सात काठ्या निघतात...लोक मोठ्या श्रद्धेनं या यात्रेला हजेरी लावतात...आशिया खंडातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होतो कारण ही यात्रा आजपासून एक महिनाभर चालते.

शिवाय सात समाजातील
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.