ETV Bharat / state

Sanjay Raut Case: संजय राऊत अडचणीत; पीडितेचा फोटो ट्विट केल्याने गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 20, 2023, 10:58 AM IST

बार्शी निर्भयाचे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. खासदार संजय राऊतांनी रक्तबंबाळ मुलीचा फोटो ट्विट केला प्रकरणी, बार्शी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Sanjay Raut
संजय राऊत अडचणीत

सोलापूर: पाच मार्च रोजी एका बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोघा संशयित आरोपीनी अत्याचार केला होता. त्यानंतर 6 मार्च रोजी पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करत, त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे येथे अक्षय विनायक माने (वय 23 वर्ष), नामदेव सिद्धेश्वर दळवी (वय 24 वर्ष, दोघे रा, बाळेवाडी ता बार्शी, जि सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडित मुलगी ही रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. खासदार संजय राऊत यांनी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला फोटो शनिवारी दुपारी ट्विट केला होता. यावरून पीडित मुलीची ओळख निर्माण झाल्या सारखे कृत्य केल्याप्रकरणी, बार्शी शहर पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

खासदार संजय राऊत अडचणीत: बार्शी तालुक्यात एका अल्पवयीन तरूणीवर बलात्कार करून त्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, कामात दिरंगाई केल्या प्रकरणी चार पोलीसांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. शिवसेना खासदार राऊत यांनी शनिवारी दुपारी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला फोटो ट्विट करत, संशयित आरोपी मोकाट आहेत. भाजप पुरस्कृत आहेत अशी माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीची ओळख दाखवण्यासारखे कृत्य केल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. अखेर बार्शी पोलीसांनी खासदार संजय राऊत यांवर भा.द.वि.जे.जे ऍक्ट 74,228-ए,नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी फोन वरून माहिती देताना ही अधिकृत माहिती दिली.

पीडितेच्या कुटुंबियांचा टाहो: पीडित तरूणीवर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोयत्याने वार केल्याने त्याच्या डोक्यावर, हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. उजव्या हाताची बोटे तुटली आहेत. पीडितेच्या आई वाडीलांनी माहिती देताना, न्याय मागितले आहे. संशयित आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. संशयित आरोपीचा बार्शीत राजकिय नेत्यांसोबत संपर्क आहे. संशयित आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत असलेले फोटो देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

हेही वाचा: Sanjay Raut On Kiren Rijiju रिजिजू यांची टिप्पणी हा तर न्यायाधीशांना धमकावण्याचा प्रयत्नः संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.