पंढरपूर (सोलापूर) - राज्य सरकारकडून मंदिरे का बंद ठेवली जातात, हा प्रश्न आहे. राज्यातील बारमध्ये तसेच मॉलमध्ये जितकी गर्दी होते. त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सुरक्षित अंतर ठेवून मंदिर खुले होऊ शकतात, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मंदिरावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा विचार करावा -
मंदिरांवर राज्यातील बऱ्याच नागरिकांचे पोट अवलंबून आहे. मंदिर परिसरातील नागरिकांचे अर्थकारण मंदिरावर सुरू होते. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरे बंद असल्याने दुकानदार, पुजारी, सफाई कामगार यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वर्षात सरकारने मंदिर परिसरातील दुकानदारांसाठी एक रुपयाही दिला नाही. राज्यातील दारूची दुकाने खुली आहेत. मात्र मंदिरे बंद का ठेवता, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा - डीएसके फसवणूक प्रकरण : डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर
हे ही वाटा -कोरोनाच्या भीतीने उच्चशिक्षित दाम्पत्याने घेतला गळफास, कोराना रिपोर्ट आला निगेटिव्ह
शाळा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा -
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार पालकांना विश्वासात घेत नाही. त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करावा. राज्य सरकारच्या बदलत्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे पालकही निराश होत आहेत. राज्य सरकारने वस्तुनिष्ठ शाळा सुरू करण्याबाबत निर्णय करावा, असा सल्ला फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.