ETV Bharat / state

Mahaparinirvan Diwas : बाबासाहेबांनी चौदावेळा केला होता सोलापूरचा दौरा, पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकाळ 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 असा आहे. ( Mahaparinirvan Diwas ) अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. प्रेरणाभूमी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेली भूमी म्हणजे सोलापूर होय. ( Mahaparinirvan Day ) महाराष्ट्र राज्यात मुंबई, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या शहरात डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थींचे दर्शन प्राप्त होते. यंदा डॉ. बाबासाहेब यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन

author img

By

Published : Dec 6, 2021, 7:58 AM IST

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकाळ 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 असा आहे. अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. प्रेरणाभूमी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेली भूमी म्हणजे सोलापूर होय. ( Babasaheb had visited Solapur ) महाराष्ट्र राज्यात मुंबई, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या शहरात डॉ. बाबासाहेब (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अस्थींचे दर्शन प्राप्त होते. यंदा डॉ. बाबासाहेब यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे. ( Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas ) या दिनानिमित्त सोलापूरच्या प्रेरणाभूमीत अस्थींचे दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला आहे. 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रेरणाभूमीत अस्थीचे दर्शन घेण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने नागरीक दाखल होतात.

महापरिनिर्वाण दिनीनिमीत्त बोलताना मान्यवर

डॉ. बाबासाहेब चौदावेळा सोलापुरात आले होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवार पेठेतील पंचाची चावडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक वतनदार महार परिषदेला 94 वर्ष पूर्ण झाली. 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी झालेल्या या परिषदेच्या ठरावामध्ये त्यांनी धर्मांतराबाबत संकेत दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 14 वेळा भेटी दिल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन
डॉ. बाबासाहेब यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन

मद्रास मेलने डॉ बाबासाहेब यांच्या अस्थी सोलापुरात दाखल

6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. पंजरापोळ चौकातील सी नरसी ट्रान्सपोर्ट मध्ये निरोप आला. ( ) ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरु जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण अबुटे, मेसा सिद्धगणेश, दराप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. 7 डिसेंबर रोजी लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब यांना अखेरचा निरोप देण्यात आला. (Dr. Babasaheb Ambedkar) तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईतच राहिले आणि 11 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थी सकाळी 8 वाजता मद्रास मेलने सोलापुरात आणण्यात आल्या.

मुंबई नागपूर नंतर नतमस्तक होण्याचे ठिकाण

देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून क्रांती आणणे सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधान तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीविहाराला आज 65 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबई नागपूर नंतर नतमस्तक होण्याचे ठिकाण म्हणजे सोलापूर येथील प्रेरणाभूमी अस्थीविहाराकडे पाहिले जाते.

हेही वाचा - Mahaparinirvan Day 2021: कसे तयार झाले दादर येथील 'चैत्यभूमी स्मारक', जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.